Join us

Year Ender 2019: या वर्षात हे स्टार्स ठरले ‘ Top Newsmakers’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 8:00 AM

2019 या मावळत्या वर्षांत अनेक बॉलिवूड स्टार्स चर्चेत राहिले.

2019 या मावळत्या वर्षांत अनेक बॉलिवूड स्टार्स चर्चेत राहिले. काही त्यांच्या चित्रपटांमुळे तर काही त्यांच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे तर काही खास कारणाने चर्चेत आलेत. होय, आज अशाच या वर्षांत चर्चेत राहिलेल्या कलाकारांची यादी आपण पाहणार आहोत.  

एकता कपूर झाली आई

2019 च्या जानेवारीत एकता कपूर सरोगसीद्वारे मुलाची आई झाली. या बातमीने एकताने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

अक्षय अन् मोदींची मुलाखत

2019 च्या एप्रिल महिन्यात अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आणि तो चर्चेत आला.  तुम्ही आंबे कसे खाता? हा प्रश्न अक्षयने मोदींना विचारला होता. यावरून अक्षय प्रचंड ट्रोल झाला होता.

मोदींचे बायोपिक

मे महिन्यात अभिनेत विवेक ओबेरॉय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच्या बायोपिकमुळे चर्चेत आला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात या बायोपिकच्या रिलीजवरून मोठा वाद  निर्माण झाला. अखेर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा सिनेमा रिलीज झाला.

रोशन कुटुंबात वादळ

जून महिन्यात हृतिक रोशनची बहीण सुनैना हिने कुटुंबातील सदस्यावर छळ व मारहाण करण्याचा आरोप लावून खळबळ निर्माण केली होती. बॉयफे्रन्ड मुस्लिम आहे म्हणून मला माझ्या वडिलांनी मारले, असा आरोप तिने केला होता. कंगनाची बहीण रंगोली हिने या वादात तेल ओतण्याचे काम केले होते.

जायराचा बॉलिवूड संन्यास

जून महिन्यातच जायरा वसीम यावर्षी तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत राहिली. दंगल या सिनेमातून पदार्पण करणारी जायरा  यानंतर ‘सीक्रेट सुपरस्टार’ या सिनेमात जायरा दिसली. पुढे प्रियंका चोप्रा व फरहान अख्तर या दिग्गजांसोबत ‘स्काय इज पिंक’ या सिनेमात तिला संधी मिळाली. पण हा चित्रपट रिलीज होण्याआधीच जायराने अ‍ॅक्टिंग सोडण्याचा निर्णय जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी...’ असे म्हणत तिने बॉलिवूड सोडले. यावरून ती ट्रोलही झाली होती.

करण जोहरची ड्रग्ज पार्टी

जुलैच्या अखेरिस करण जोहरची पार्टी चर्चेत आली होती. या पार्टीत हजर असलेल्या स्टार्सनी ड्रग्जचे सेवन केले, असा आरोप ठेवण्यात आला होता. या पार्टीचा व्हिडीओही चर्चेत आला होता.

कंगना भडकली

जुलै महिन्यातच ‘जजमेंटल है क्या’च्या पत्रकार परिषदेत कंगना राणौत एका पत्रकारावर बरसली होती. ती पत्रकारावर अशी काही संतापली होती की, पत्रकारांनी तिच्यावर बंदी लादली होती.

‘इंशाअल्लाह’ बंद

संजय लीला भन्साळींनी सलमान खान व आलिय भट यांना घेऊन ‘इंशाअल्लाह’ या सिनेमाची घोषणा केली होती. पण या घोषणेनंतर अचानक त्यांनी हा प्रोजेक्ट बंद करण्याची धक्कादायक घोषणा केली. दबंग सलमानसोबतच्या मतभेदांमुळे भन्साळींनी हा सिनेमा बंद केल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे या वर्षांत भन्साळींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘कबीर सिंग’वर आरोप

शाहिद कपूर यावर्षी ‘कबीर सिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत राहिला. ‘कबीर सिंग’ यात शाहिदने सनकी डॉक्टरची भूमिका साकारली. या सिनेमाने बक्कळ कमाई केली. पण हा सिनेमा महिला विरोधी असल्याचा आरोप करत यानिमित्ताने शाहिदवर प्रचंड टीकाही झाली.

 

 

टॅग्स :फ्लॅशबॅकएकता कपूरकबीर सिंगकंगना राणौत