अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा या दोघांनी तर २०२० मध्येच लग्न करणार असल्याची अप्रत्यक्षरित्या जाहीर केले होते. परंतु कोरोनामुळे लग्न तर दुरच दोघांनाही लॉकडाऊनमध्ये वेळ घालवावा लागला. दरम्यान दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.
आता ते पूर्णपणे बरे झाले असून सर्व काही सुरळीत होण्याची जणू वाट पाहात आहेत. तेव्हाच या दोघांचा लग्नाचा बार उडेल असे सध्या तरी दिसतंय.
ट्रेंडिंग कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची अफवा होती. रणबीर आणि आलियाला बर्याचदा एकत्र पाहिले गेले. 2020 मध्ये दोघेही लग्न करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. पण तसे होऊ शकले नाही.
अली फजल आणि रिचा चड्ढा यांनी जाहीर केले होते की ते 2020 मध्ये लग्न करणार आहेत. लग्नाची तयारीही सुरू झाली होती. पण यानंतर कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाला आणि जोडीने त्याचा विचार बदलला आणि लग्न या वर्षी तरी करणार नसल्याचे जाहीर केले.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या उत्कृष्ट बॉन्डिंगबद्दल सर्वांना माहिती आहे. 2020 मध्ये या दोघांच्याही लग्नाच्या बातम्या आल्या होत्या.
भावाच्या लग्नानंतर अशी चर्चा आहे की आदर जैनसुद्धा गर्लफ्रेंड तारा सुतारियाशी लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात करणार आहे. आदर आणि तारा नेहमीच त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत असतात. आयुष्याची नवीन सुरूवात करण्यासाठी 2021 मध्ये त्यांचे लग्न करू शकतात.