बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ख्रिसमसमध्ये खूप व्यस्त असणार आहे. सध्या जॅकलिन तिच्या आगामी सिनेमा ‘भूत पोलिस’ आणि ‘सर्कस’ सिनेमाचे बॅक टू बॅक शूटिंग करते आहे. जॅकलिनने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी तिने आई-वडिलांना मुंबईत बोलवलं होतं, परंतु कोरोनामुळे सगळी गणित बिघडली.
जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २००८ साली तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. शेवटची ती नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या मिसेस सीरियल किलरमध्ये दिसली होती.