Join us

यो यो हनी सिंग नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; 9 वर्षांनंतरही तोच जलवा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 17:12 IST

यो यो हनी सिंगचे 'कलास्टार' हे गाणे रिलीज झाले आहे.

प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग पुन्हा एकदा त्याच जोशात चाहत्यांच्या भेटीला आला आहे. आज यो यो हनी सिंगचे 'कलास्टार' हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे 2014 मध्ये आलेल्या 'देसी कलाकर'चा दुसरा भाग आहे. जे पाहून चाहते खूश आहेत. 

यो यो हनी सिंग आणि सोनाक्षी सिन्हा 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसले. 2014 मध्ये रिलीज झालेले 'देसी कलाकर' हे गाणे लोकांना खूप आवडले होते. 'देसी कलाकर' गाणे जिथे संपले होते, तेथूनच  'कलास्टार' गाण्यात स्टोरी पुढे नेण्यात आली आहे.  काही वेळातच या गाण्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. 

हनी सिंगने आपल्या करिअरमध्ये  'ब्राऊन रंग', 'देसी कलाकर', 'ब्लू आईज' सारखी सुपरहिट गाणी दिली. हनी सिंगचा जन्म 15 मार्च 1883 रोजी पंजाबमधील होशियारपूरमध्ये झाला. हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. संगीत क्षेत्रात पदार्पण करताच हिरदेशचे "यो यो हनी सिंग" या नावाने ओळख निर्माण केली.  हनी सिंगचे चाहते फक्त भारतापुरतेच मर्यादित नसून जगभर पसरलेले आहेत.

सोनाक्षी सिन्हाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती रितेश देशमुखसोबत 'काकुडा' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एक हॉरर-कॉमेडी आहे, जो 13 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :हनी सिंहसोनाक्षी सिन्हाबॉलिवूड