Join us

"तू आमच्या आयुष्यात...", अरबाजची लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्नी शूरासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:01 IST

Arbaaz Khan : बॉलिवूड अभिनेता अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्नी शूरासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि शूरा खान (Shura Khan)च्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले. त्यांच्या लग्नाला काही खास मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अरबाजने शूरावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याने अनेक रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर रवीना टंडनची मुलगी राशा थडानीनेही कमेंट केली आहे.

अरबाज खानने २४ डिसेंबर २०२३ रोजी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत बहीण अर्पिता खान शर्माच्या घरी शूरासोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो शेअर करत खुशखबर दिली होती. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले असून त्यानिमित्ताने अरबाजने शूरासोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. त्याने लिहिले की, माझी प्रिय शूरा, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या आयुष्यात आनंद आणि हसू घेऊन आली आहेस. हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. डेटिंगचे एक वर्ष आणि मग लग्नाला एक वर्ष...असे वाटते की मी तुला आधीपासून ओळखत होतो. निस्वार्थपणे प्रेम करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आणि काळजी घेतेस, त्यासाठी तुझे आभार. या पोस्टमधून अरबाजने ते दोघे एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले. दोघांच्या वयात बरेच अंतर असतानाही त्यांनी एकमेकांची जीवनसाथी म्हणून निवड केली.

राशा थडानीने अरबाज खानला दिल्या शुभेच्छा अरबाज खानच्या या पोस्टवर रवीना टंडनची मुलगी राशा थडानीने लिहिले, 'हॅपी ॲनिव्हर्सरी.' तसेच तीन लाल हार्ट इमोजीसह प्रेमाचा वर्षाव केला. याशिवाय गायिका हर्षदीप कौरनेही दोघांना शुभेच्छा दिल्या. अरबाजने १२ डिसेंबर, १९९८ रोजी मलायकासोबत लव्हमॅरेज केले होते आणि १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव आहे अरहान.

टॅग्स :अरबाज खान