नव्वदच्या दशकात ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर ते माधुरी दीक्षित अशा अभिनेत्रींनी बॉलिवूडवर राज्य केले. जुही चावला हे देखील या काळातील प्रसिद्ध नाव होते. ९०च्या दशकात जुही चावलाने शाहरुख खानपासून ते आमिर खानपर्यंत अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. या काळात माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)सोबतचे तिचे वैरही गाजले. सर्वांना माहित होते की, या दोघी एकमेकांचा द्वेष करतात. आता बॉलिवूड दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी माधुरी दीक्षित आणि जुही चावला (Juhi Chawla) यांच्यातील वैर पुष्टी करणारी एक घटना सांगितली आहे.
'राज हिंदुस्तानी'चे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी लहरेन रेट्रोशी बोलताना या घटनेचा उल्लेख केला. दिग्दर्शकाने सांगितले की, 'लुटेरे' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट केल्यानंतर त्याने अभिनेत्रीला राजा हिंदुस्तानीमध्ये मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. हा लुटेरेसारखा मसाला चित्रपट नसला तरी दिग्दर्शकाने जुहीला आश्वासन दिले की सूरज बडजात्याच्या रोमँटिक म्युझिकल 'हम आपके है कौन' प्रमाणे 'राजा हिंदुस्तानी' हिट ठरेल, ज्यामध्ये सलमान खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.
अन् जुहीने चित्रपटात काम करण्यास दिला नकार...
धर्मेश सांगतो की संपूर्ण कथा ऐकल्यानंतर जुहीने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले की, 'पण, तू सूरज बडजात्या नाहीस.' धर्मेश म्हणाला की, 'हे ऐकून मला विचित्र वाटले. मलाही खूप अहंकार आहे. जुहीचे म्हणणे ऐकून मी तिला म्हणालो, 'आणि तू माधुरी दीक्षित नाहीस.' या छोट्या गोष्टीवर जुहीला खूप राग आला आणि तिने चित्रपट करण्यास नकार दिला. पण, ती शिकलेली आहे. तिने दुसऱ्या दिवशी मला फोन केला आणि त्याच्या वागणुकीबद्दल माफी मागितली. यासोबतच तिने मला चित्रपटात घेण्यास सांगितले.
वैर विसरत जुही चावला आणि माधुरी दीक्षितने २०१४मध्ये केलं एकत्र काम
दिग्दर्शकाने पुढे सांगितले की, ज्या दिवशी तो जूही चावलाला राजा हिंदुस्तानीसाठी भेटणार होता, त्याच दिवशी तो करिश्मा कपूरला भेटला. त्याने राजा हिंदुस्तानीची कथा करिश्माला सांगितली आणि तिने चित्रपटासाठी होकार दिला. त्याने सांगितले की आमिर खानने देखील तिच्या निवडीस सहमती दर्शविली आणि नंतर दोन्ही स्टार्सना या ब्लॉकबस्टर चित्रपटातील आपापल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार देखील मिळाला. मात्र, २०१० मध्ये जुही चावला आणि माधुरी दीक्षित यांनी आपले वैर विसरून २०१४ मध्ये सौमिक सेन दिग्दर्शित 'गुलाब गँग'मध्ये एकत्र काम केले होते.