Join us

महेश बाबूच्या ‘या’ चित्रपटाची दोन आठवड्यातील कमाई जाणून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2018 10:41 AM

महेश बाबूच्या ‘भारत अने नेनु’ या चित्रपटाने दोनच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई करीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. चित्रपटाच्या कमाईचा जोर पाहता आगामी काळात अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे करण्याची शक्यता आहे.

सुपरस्टार महेश बाबूच्या ‘भारत अने नेनु’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलीत. दुसºया आठवड्यातही हा सिलसिला कायम असल्याचे दिसून आले. कारण चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ताबडतोब कमाईचा जोर कायम ठेवला. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरही चित्रपटाचे प्रदर्शन वाखाणण्याजोगे असून, ताज्या आकड्यांनुसार चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ब्लॉकबस्टर ‘बाहुबली-२’लाही मागे टाकले आहे. होय, ‘भारत अने नेनु’ या चित्रपटाने केवळ १२ दिवसातच १९२.७४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३५ लाख डॉलरची कमाई करतानाच विदेशातील कमाईचा जोर कायम ठेवला आहे. एकट्या चेन्नईमध्ये या चित्रपटाने १.७५ कोटीपेक्षा अधिक रुपये कमाविले आहेत. असा अंदाज लावला जात आहे की, हा चित्रपट दोन आठवड्यातच २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल. असे झाल्यास ‘बाहुबली’नंतर तेलुगूमध्ये सर्वात कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. दरम्यान, चित्रपटात महेश बाबूने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट अमेरिकेतही बाहुबली फ्रेंचाइजीला मागे सोडत झपाट्याने कमाई करीत आहे. महेश बाबूचा हा चित्रपट भारतासह ४५ देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या अगोदर महेश बाबूच्या ‘श्रीमन्थुदु’ या चित्रपटाने जगभरात दोन अरब रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शनानंतरच सर्वाधिक कमाई करणाºया तेलुगू चित्रपटांमध्ये तिसरा ठरला होता.