Join us

अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या ब्रालेटची किंमत ऐकून व्हाल थक्क! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 08:07 IST

दीपिका ही नेहमीच अत्यंत महागड्या किमतीच्या वस्तू वापरते.

बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोनने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. यात तिनं पांढऱ्या रंगाचे प्रिंटेड ब्रालेट घातले असून, त्याची स्ट्रीप काळ्या रंगाची आहे. त्यासोबत तिनं लेदरची पँट परिधान केली आहे. विशेष म्हणजे या लूकला मॅच होईल असे सिल्व्हर रंगाचे हिल्सही तिनं घातले आहेत. मात्र, यावर तिनं काहीही ज्वेलरी घातलेली नसली तरी उत्तम मेकअप केला आहे. 

दीपिका ही नेहमीच अत्यंत महागड्या किमतीच्या वस्तू वापरते. तिचे कपडे, बॅग्स, सँडल्स यासह सर्वत्र गोष्टींची किंमत लाखांच्या घरात असते. दीपिकाने घातलेल्या ब्रालेटची किंमत ही १०८४ अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण ७९ हजार ६७० रुपये इतकी आहे. तिच्या एका ब्रालेटची किंमत पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

टॅग्स :बॉलिवूडदीपिका पादुकोण