गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणार्या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे. रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं. त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही.
'दो अनजाने' हा या जोडीचा पहिला सिनेमा. या सिनेमापासूनच अमिताभ-रेखा जोडी रसिकांना भावली. यानंतर विविध सिनेमातून अमिताभ-रेखा जोडीनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं. दोघांच्या अनोख्या केमिस्ट्रीमुळे आणि सिनेमाच्या यशामुळे रिअल लाइफमध्ये दोघं आणखी जवळ आले. अमिताभ आणि रेखा लग्न करणार अशा चर्चाही रंगल्या. मात्र तसं काहीच घडलं नाही. त्याच काळात अमिताभ-रेखा-जया यांच्या प्रत्यक्ष जीवनात सुरु असलेल्या उलथापालथीचं चित्रण करणारा सिलसिला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला.
यांत अमिताभ-रेखा यांचं अव्यक्त प्रेम, त्यांची केमिस्ट्री सिनेमातील विविध सीन्स आणि गाण्यांमधून रसिकांना पाहायला मिळाली. त्यानंतर अमिताभ-रेखा एका सिनेमात कधीच झळकले नाही. विविध कार्यक्रमांमध्ये दोघंही एकमेंकांपासून खूप लांब लांब बसल्याचं पाहायला मिळतं. मात्र कॅमेर्याच्या नजरा त्या दोघांवरच असतात. एखाद्या क्षणी दोघं चुकून समोरा समोर आले तर त्याचीही बातमी बनते. त्यामुळेच अमिताभ (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची लव्हस्टोरी आजही रसिकांसाठी फार मोठं कोडं आहे.
प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे. त्यापैकी महानायक आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर असलेलं प्रेम त्या कधीच लपवू शकल्या नाहीत हेही उघड सत्य आहे. बिग बींवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि किंबहुना आहे. मात्र हे वास्तव त्यांनी आजवर कधीही स्वीकारलं नाही. अगदी सुरुवातीपासून अमिताभ आणि रेखाच्या अफेयरच्या खुमासदार चर्चा रंगल्या.प्रत्येकवेळी त्याची चर्चा झाली. खुद्द रेखानंही एका जुन्या मुलाखतीमध्ये अमिताभबद्दल च्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अमिताभ आणि रेखा यांच्याबद्दल अनेक किस्से आपण वाचले आहेत. सध्या असाच एक किस्सा चर्चेत आहे.
रेखा यांचे शूटिंगला उशीरा येणं अमिताभ यांना अजिबात आवडायचे नाही. अनेकदा अमिताभ रेखा यांच्यावर त्यांच्या याच सवयीमुळे चिडायचे.रेखा यांची सवय मोडण्यासाठी अमिताभ वेळेच गांभिर्य सांगायचे.मात्र नंतर रेखा यांनी सुद्धा कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहचण्याची स्वतःला सवयच लावून घेतली होती.