सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांचे लग्नापर्यंत अफेअर खूप चर्चेत होते. सैफ अली खानचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी १९९१ मध्ये सैफ अली खानने अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले होते. सैफचे पहिले लग्नही खूप चर्चेत आले होते. खरे तर लग्नाच्या वेळी अमृता इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असताना सैफने तेव्हा चित्रपटात पदार्पणही केले नव्हते. मात्र, लग्नाच्या १३ वर्षानंतर सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००८ मध्ये अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ आणि करीना यांच्यात जवळीक वाढली होती.
खरेतर सैफ आणि करीना 'टशन' चित्रपटाचं शूटिंग करत होते आणि तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र, करीनाच्या म्हणण्यानुसार, सैफसोबत लग्न करणे इतके सोपे नव्हते. बेबोनं एका मुलाखतीत सांगितले होते की, सैफसोबत लग्न करण्यापूर्वी तिच्या आजूबाजूच्या लोकांनी काय सांगितले होते. करीनाला लोकांनी तिला सांगितले की, 'सैफ दोन मुलांचा बाप आहे आणि त्याच्याशी लग्न केल्याने तुझे करिअर बर्बाद होईल'. करीनाच्या म्हणण्यानुसार, लोकांकडून हे ऐकल्यानंतर तिला वाटले की, प्रेमात पडणे हा एवढा मोठा गुन्हा आहे का? जर होय, तर लग्न करूया आणि पुढे काय होते ते पाहूया!