सध्या सगळीकडे 'तुंबाड' सिनेमाची चर्चा आहे. २०१८ साली रिलीज झालेला 'तुंबाड' सिनेमा ६ वर्षांनी पुन्हा रिलीज झालाय. 'तुंबाड' सिनेमाने पुन्हा रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केलीय. सिनेमाने १० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. सध्या अनेक सिनेमे पुन्हा रिलीज होत असताना सर्वांच्या मनाच्या जवळ असलेला एक खास सिनेमा पुन्हा रिलीज होतोय. हा सिनेमा म्हणजे 'रामायण'. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या जवळ असलेला 'रामायण' हा अॅनिमेशनपट पुन्हा रिलीज होतोय. विशेष गोष्ट म्हणजे, टीव्हीवर लोकप्रिय झालेला हा सिनेमा भारतात थिएटरमध्ये मात्र बॅन करण्यात आला होता.
रामायण हा अॅनिमेशनपट पुन्हा होतोय रिलीज
कार्टून नेटवर्कवर आजही रिलीज झाल्यावर आवडीने पाहायला जाणारा अॅनिमेशनपट म्हणजे 'रामायण- द लेजेंड ऑफ प्रिन्स राम'. या अॅनिमेशनपटाला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी आवाज दिला होता. हा सिनेमा आता भारतात दिवाळीच्या आधी आणि दसऱ्यानंतर रिलीज होतोय. १८ ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होतोय. त्यामुळे सर्वांना आनंद झालाय. या अॅनिमेशनपटाला अरुण गोविल यांनी श्रीरामांचा आवाज दिला. अमरीश पूरी यांनी रावणाला आवाज दिला होता. शत्रुघ्न सिन्हा हे सिनेमाचे कथावाचक होते.
अॅनिमेशनपटाला भारतात का केलेला विरोध
आजही सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलेला 'रामायण' या अॅनिमेशनपटाला भारतात कडाडून विरोध झाला होता. या सिनेमाची निर्मिती जपान देशाने केली होती. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने सिनेमाच्या विरोधात पत्रक जारी केलं. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्याने 'रामायण' या गाथेचं कार्टून स्वरुप करुन सरकारसमोर प्रस्ताव ठेवला. परंतु 'रामायण' सारख्या संवेदनशील विषयाला कार्टून स्वरुपात लोकांसमोर आणण्यास सरकारने विरोध दर्शवला. त्या काळात भारतात अयोध्या रामजन्मभूमीवरुन वाद सुरु होता. त्यामुळे अशा तणावपूर्ण वातावरणात 'रामायण' हा अॅनिमेशनपट रिलीज करणं निव्वळ अशक्य होतं. पुढे भारतात या सिनेमावर जरी बंदी आणली असली तरीही कार्टून नेटवर्कसारख्या चॅनलवर हा सिनेमा दाखवण्यात आला.