युक्ता मुखीने मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर 2002 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती कटपुतली आणि लव इन जापान सिनेमात दिसली होती. मिस वर्ल्डचा किबात जिंकलेली युक्ता आज काय करते आहे हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच तिचा अभिमान वाटेल. सध्या ती पुण्यात असते. युक्ता सध्या अनेक सामाजिक संघटनेनेशी जोडलेली आहे. त्या संस्थांसाठी युक्ता मोलाचे सहकार्य करते.
2018मध्ये पुण्यातील डॉ.सलिम अली अभारण्यातून पालिकेचा प्रस्तावित रस्ता केला जाणार होता त्यामुळे शेकडो झाडांची कत्तल केली जाणार होती या संरक्षण मोहिमेमध्ये पुणेकरांना बरोबर युक्तादेखील सहभागी झाली होती. महिलांसाठी देखील युक्ता काम करते. शेतकऱ्यांसाठी देखील पुढकार घेऊन ती प्रदर्शन भरवत असते. 2019मध्ये रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी व कनेक्टिंग एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला होता. या विश्वसुंदरी युक्ता मुखीने देखील आपला सहभाग नोदवला होता.यावेळी निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या ४२ महिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
अशा विविध उपक्रमात युक्ता सक्रिय असते. बॉलिवूडलच्या झगमगत्या दुनियेला रामराम करुन जगातील इतर विश्वसुंदरींना जे करता आले नसले ते युक्ता मुखींने करुन दाखवले. त्यामुळे ही बातमी वाचल्यावर तुम्ही युक्ताच्या कामाचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत.