Join us

युलिया वंतूरने शेअर केली इमोशनल पोस्ट; सलमान खानवर साधला निशाणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 9:01 AM

सुपरस्टार सलमान खान आणि रोमानियन ब्यूटी युलिया वंतूर एकमेकांना डेट करीत आहेत की नाही याविषयी सांगणे अवघडच म्हणावे लागेल. ...

सुपरस्टार सलमान खान आणि रोमानियन ब्यूटी युलिया वंतूर एकमेकांना डेट करीत आहेत की नाही याविषयी सांगणे अवघडच म्हणावे लागेल. मात्र दोघांमध्ये कुठले ना कुठले नाते नक्की असावे हे मात्र ठामपणे सांगता येईल. सलमान आणि युलिया एकत्र फार कमी वेळा बघावयास मिळतात. मात्र जेव्हा-केव्हा बघावयास मिळतात तेव्हा मात्र त्यांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगते. आता तुम्ही म्हणाल की, सलमान आणि युलिया एवढ्यात केव्हा एकत्र बघावयास मिळाली, जेणेकरून त्यांच्याविषयी चर्चा केली जात आहे. तर हे दोघे एकत्र बघावयास मिळाले नसून, युलियाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे सलमान चर्चेत आला आहे. होय, युलियाने शेअर केलेल्या एका पोस्टचा संबंध थेट सलमानशी जोडला जात आहे. युलियाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून पुन्हा एकदा सलमानसोबतच्या नात्याला हवा दिली आहे. युलियाने ट्विटमध्ये लिहिले की, ‘प्रेमाचा शोध घेणे हीच माझी सर्वात मोठी चूक होती. प्रेम व्यक्तीला एक चांगला व्यक्ती बनविते. त्या व्यक्तीचा शोध घेऊ नका ज्याच्याशी तुम्हाला आयुष्य काढायचे असते, तर त्या व्यक्तीचा शोध घ्या ज्याच्यासोबत लोक आपले आयुष्य व्यतित करू इच्छितात.’ या अगोदरही युलियाने व्हॅलेंटाइन डेनिमित्त सलमानसोबतच्या लग्नाच्या प्रश्नावर एक मोठे वक्तव्य केले होते. युलियाने म्हटले होते की, ‘मला नाही वाटत की, लग्न आवश्यकच आहे. जेव्हा दोन लोक एकमेकांवर प्रेम करीत असतात तेव्हा लग्नाची गरजच काय? मला माझी स्वतंत्र ओळख बनवायची आहे. मला नाही वाटत की सलमान खानची गर्लफ्रेंड म्हणून लोकांनी मला ओळखावे. मी रूमानियात स्वत:च्या हिमतीवर ओळख बनविली आहे. आता मी याठिकाणीदेखील स्वत:ला सिद्ध करू इच्छिते.’ दरम्यान, असे म्हटले जात आहे की, सलमान आणि युलिया गेल्या बºयाच काळापासून एकमेकांना डेट करीत आहेत. वास्तविक सलमानने युलियासोबतच्या नात्याबद्दल कधीही वाच्यता केली नाही. या अगोदर सलमानचे नाव कॅटरिना कैफ आणि ऐश्वर्या राय यांच्याशी जोडले गेले आहे.