Join us

हिमेशसोबत युलियाने गायले मधाळ गाणे; टीझर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2016 12:54 PM

आता तुम्हाला वाटेल हिचे सल्लूमियाँसोबत ब्रेकअप झाले अन् ती गाण्याकडेच वळली, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण तिने गायनाच्या क्षेत्रात हिमेशसोबत डेब्यू केला आहे. हिमेशसोबतच्या आगामी म्युझिक अल्बममध्ये तिची अतिशय क्यूट ट्यूनिंग जमलेली दिसतेय.

युलिया वेंटर ही एक होस्ट तर चांगली आहेच पण, तुम्हाला माहितीये का ती एक उत्तम गायिकाही आहे. खरं वाटत नसेल तर नुकताच आऊट करण्यात आलेल्या तिच्या ‘एव्हरी नाईट अ‍ॅण्ड डे’ गाण्याचा टीझर पाहा. आता तुम्हाला वाटेल हिचे सल्लूमियाँसोबत ब्रेकअप झाले अन् ती गाण्याकडेच वळली, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. कारण तिने गायनाच्या क्षेत्रात हिमेशसोबत डेब्यू केला आहे. हिमेशसोबतच्या आगामी म्युझिक अल्बममध्ये तिची अतिशय क्यूट ट्यूनिंग जमलेली दिसतेय.                            रोमानियन टीव्ही होस्ट म्हणून युलिया वेंटरची ‘बी टाऊन’ मध्ये ओळख तयार झाली. त्यानंतर सलमान खानसोबतचे तिचे नाते आता सर्वांच्या उत्सुकतेचा भाग बनले आहे. ते दोघे आता केवळ मित्र-मैत्रीण आहेत की त्यापुढेही त्यांच्यात काही नाते आहे, या पेचात अजून त्यांचे चाहते आहेत. मध्यंतरी कळाले होते की, युलिया सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर परत रोमानियाला निघून गेली. मात्र, तसे नसून तिला सलमानला सोडून कुठेच जावेसे वाटत नाहीये, असे दिसतेय. तिने हिमेशसोबत एक म्युझिक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. ज्यात ती हेडफोन कानाला लावून हिमेशसोबत ‘एव्हरी नाईट अ‍ॅण्ड डे’ हे गाणे मोठ्या दिमाखदारपणे म्हणताना दिसतेय. हे संपूर्ण गाणे हिंदीतून असून त्याची के वळ एकच ओळ ही इंग्रजीतून आहे. गाण्याचे विशेष युलिया असली तरीही हिमेशने त्याची वेगळी छाप त्या गाण्यासोबत द्यायला तो विसरलेला नाहीये. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने आत्तापर्यंत अनेकांना ‘बी टाऊन’ मध्ये डेब्यूची संधी दिली आहे. अनेकांना त्याच्यामुळे चांगल्या भूमिका मिळाल्या. मग असा भाईजान त्याची एक्स गर्लफ्रेंड युलिया वेंटर हिच्या बॉलिवूडमधील करिअरसाठी मदत करणार नाही का? सुत्रांनुसार, सल्लूमियाँ युलियाच्या आवाजातील सहा गाण्याचा म्युझिक अल्बम भारतात लवकरच लाँच करणार आहे. ">http://