Join us

युवराज सिंगच्या रिटायरमेंट पार्टीला या कारणामुळे दिसला नाही त्याचा एकेकाळचा बेस्ट फ्रेंड अंगद बेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 6:20 PM

युवराज आणि अंगद बेदी हे एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते.

ठळक मुद्देअंगद आणि त्याची पत्नी नेहाला या रिटायरमेंट पार्टीचे निमंत्रणच देण्यात आलेले नव्हते. अंगद हा प्रसिद्ध क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा असून तो देखील एकेकाळी क्रिकेट खेळायचा. 

युवराज सिंगने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट घोषित केली. त्याने नुकतीच त्याच्या मित्रमैत्रिणींसाठी रिटायरमेंट पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला क्रिकेट जगतासोबतच त्याचे बॉलिवूडमधील अनेक मित्रमैत्रीण दिसले. फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, सानिया मिर्झा, नीता अंबानी, आकाश अंबानी यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी या पार्टीला हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर युवराजची एक्स गर्लफ्रेंड किम शर्मा देखील या पार्टीत दिसली. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण युवराजचा एकेकाळचा बेस्ट फ्रेंड या पार्टीत दिसला नाही. त्याचा हा मित्र पार्टीला का आला नाही याची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे.

युवराज आणि अंगद बेदी हे एकेकाळी एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. अंगद या पार्टीला का आला नाही याविषयी स्पॉटबॉयने वृत्त दिले आहे. त्यांच्या वृत्तानुसार, अंगद आणि त्याची पत्नी नेहाला या रिटायरमेंट पार्टीचे निमंत्रणच देण्यात आलेले नव्हते. अंगद हा प्रसिद्ध क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा मुलगा असून तो देखील एकेकाळी क्रिकेट खेळायचा. 

युवराज आणि अंगद हे लहानपणापासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. एकमेकांच्या घरगुती समारंभात देखील त्यांना पाहाण्यात येत असे. एवढेच नव्हे तर युवराजच्या लग्नात देखील अंगद आवर्जून उपस्थित होता. पण अंगद आणि युवराजची मैत्री काही दिवसांपूर्वी तुटली. अंगद आणि नेहा यांनी 2018 मध्ये अचानक लग्न केले. तेव्हापासूनच त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. 

नेहा आणि युवराज 2014 मध्ये एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात होते. त्या दोघांच्या लग्नानंतरच युवराज आणि अंगद यांच्यात अबोला निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर अंगदच्या लग्नात देखील युवराजला बोलावण्यात आलेले नव्हते. त्यावेळी मीडियाशी बोलताना अंगदने सांगितले होते की, माझे लग्न घाईगडबडीत झाल्याने मी युवराजला बोलावले नव्हते. पण हेही खरे आहे की, माझ्यात आणि युवराजमध्ये पहिल्यासारखी मैत्री आता राहिलेली नाही. 

टॅग्स :युवराज सिंगनेहा धुपिया