Join us

IND vs NZ सामन्यात युजवेंद्र चहलसोबत स्पॉट झाली 'मिस्ट्री गर्ल', फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 18:59 IST

युजवेंद्र चहल आणि 'मिस्ट्री गर्ल'चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Yuzvendra Chahal: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ( ICC Champions Trophy) आज (९ मार्च २०२५) भारत आणि न्यूझीलंड आमने-सामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (IND vs NZ Champions Trophy 2025 Final)  खेळवला जातोय.  टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. हा सामना लाइव्ह पाहण्यासाठी टीम इंडियातून बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पोहचला. यावेळी तो एकटा नव्हता तर त्याच्यासोबत 'मिस्ट्री गर्ल' दिसली आहे.

युजवेंद्र चहल आणि 'मिस्ट्री गर्ल'चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, 'मिस्ट्री गर्ल'नं पांढरा टी-शर्ट आणि काळा सनग्लास घातलेला दिसतोय. तर युजवेंद्र चहल हा काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा जॅकेटमध्ये दिसला. दोघेही आनंदात सामना पाहत असल्याचं दिसून येतंय. 

सामना भारत आणि न्यूझीलंडचा असला तरी चर्चा मात्र चहलसोबत दिसणाऱ्या 'मिस्ट्री गर्ल'ची होत आहे.  चहलसोबत स्पॉट झालेली ही 'मिस्ट्री गर्ल' आरजे मैहवश (RJ Mahvash) आहे. आता त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, युजवेंद्र चहल याचा पत्नी धनश्री वर्मासोबत काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झालाय. दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एकमेकांसोबतचे फोटो देखील डिलीट केले आहेत. डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे लग्न झालं होतं. रिपोर्ट्सनुसार ते लवकरच घटस्फोटाची घोषणा करतील.

 

टॅग्स :युजवेंद्र चहलचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५न्यूझीलंडसेलिब्रिटी