Join us

अमेरिकन वंशाचा अभिनेता दिसणार हिंदी वेबसिरीजमध्ये, आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये आपली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 8:00 AM

असे म्हणतात कलाकाराला कधीच भाषेचे, सीमेचे बंधन नसते. हीच म्हण तंतोतंत खरी ठरली आहे ती अभिनेता जॅक्री कफिनच्याबाबत.

ठळक मुद्देयात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे.'मेरी कॉम' सिनेमातून त्याने हिंदी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले

असे म्हणतात कलाकाराला कधीच भाषेचे, सीमेचे बंधन नसते. हीच म्हण तंतोतंत खरी ठरली आहे ती अभिनेता जॅक्री कफिनच्याबाबत. मुळचा अमेरिकन वंशाचा अभिनेता जॅक्री कफिनने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. लवकरच जॅक्री आपल्याला हवा बदले हसू या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. यात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे. पर्यावरण मित्र रिक्षाचालक हासू (चंदन रॉय)च्या विरोधात कारस्थान करताना तो दिसणार आहे. जॅक्रीची भूमिका रहस्यमयी असून तो हसूला आपल्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्नात असणार आहे. 

३५ देशांमध्ये राहिलेला जॅक्री बॉलिवूडमधील त्याच्या कामाबाबत आणि हवा बदले हासू मधील भूमिकेबद्दल बोलताना म्हणाला की, "मी न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले पण आता मुंबईचं माझं घर आहे. मी गेले १० वर्षांपासून मुंबईत रहातो. तुम्ही मला मुबंईतून बाहेर काढू शकता पण माझ्यातून मुंबई बाहेर कधी काढू शकणार नाहीत. माझी सुरुवात मी नाटकांपासून केली. नीरज काबी आणि आकर्ष खुराणा यांच्याबरोबर मी पृथ्वी आणि एनसिपीएमध्ये परफॉर्म केले. तसेच नाटकादरम्यान मला देश फिरायची संधी मिळाली आणि त्याचा मला आनंद आहे.''

''महाकुंभ मालिकेत मी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'मेरी कॉम' हा माझा पहिला हिंदी सिनेमा आहे. तेव्हापासून आतापर्यंत मी जवळपास ५० शोज आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. नुकत्याच आलेल्या वेगवेगळ्या वेबसिरीजमध्ये देखील मला काम करण्याची संधी मिळाली. मला वेबसिरिज करायला आवडते कारण त्यात वेगळे-वेगळे विषय आणि अभिनय स्वतंत्र असते. 'हवा बदले हसू'सुद्धा अशीच एक वेगळा विषय मांडणारी वेबसिरीज आहे. मी माझ्या यातील भूमिकेबाबत जास्त सांगू शकत नाही पण ऐवढे मात्र नक्कीच सांगू शकतो की अशाप्रकारची व्यक्तिरेखा तुम्ही आत्तापर्यंत पाहिली नसेल. खरंतर ही पूर्ण वेबसिरीज अद्भुत आहे. सगळ्या वेबसिरीजपेक्षा वेगळी आहे. पर्यावरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेली थ्रिलर वेबसिरीज नव्या पिढीला नक्कीच आवडेल. मला आनंद आहे की मी या वेबसिरीजचा एक भाग आहे. तसेच 'हवा बदले हसू'कडून मला खूप अपेक्षा आहेत.''  

जॅकने 'मॅरी कॉम' सिनेमात बॉक्सिंग प्रशिक्षकाची भूमिका साकारत त्यांने हिंदी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले. यानंतर मात्र त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. जॅकच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्याने बरेच बिग बजेट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले.  त्यात 'बेबी, 'टायगर जिंदा है', 'जुडवा २', 'सिमरन', 'हाऊसफुल ३' आणि 'परमाणु -स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमांमध्ये त्यांने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. जॅक्रीनने 'मेड इन हेवन' आणि 'इनसाईड एज'सारख्या बेससिरीजमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 

'हवा बदले हासू' ही विज्ञान-पर्यावरणपूरक थ्रिलर वेबसिरीज आहे. ज्याची सुरुवात एक सामान्य माणसाच्या जीवनशैलीशीपासून होऊन नंतर पुढे ती वाढत जाऊन त्याचे रुपांतर वैज्ञानिक कथेत होते.सप्तराज सिवा यांनी दिग्दर्शन केले आहे तर प्रतिक मुजुमदार यांनी या वेबसिरीजची निर्मिती तसेच सहाय्यक लेखकाची जबाबदारी सुद्धा सांभाळली आहे. लवकरच ही वेबसिरीज सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :वेबसीरिजजॅक्री कफिन