बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) गेल्या अनेक दिवसांपासून पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीच्या रिलेशनशिपची चर्चा जोरात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी सोनानं गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सोना ‘नोटबुक’ फेम अभिनेता जहीर इक्बालसोबत (Zaheer Iqbal) रिलेशनशिपमध्ये (Sonakshi Sinha Zaheer Iqbal affair) असल्याचं मानलं जातंय. सोनाक्षी व जहीर अद्याप यावर काहीही बोललेले नाहीत. पण आता जहीरच्या एका पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. होय, या पोस्टमध्ये जहीरने सोनाक्षीवरच्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे.
सोनाक्षीनं 2 जूनला आपला वाढदिवस साजरा केला. मग जहीर कसा मागे राहणार? एका जेंटलमॅन सारखी जहीरने सोनासाठी एक स्पेशल बर्थ डे पोस्ट शेअर केली. जहीरने पोस्ट थोडी उशीरा केली. पण ही पोस्ट वाचून सगळ्यांना कळायचं ते कळलं.
जहीरने कन्फर्म केलं रिलेशनशिप?होय, काल जहीरने सोनाचा एक व्हिडीओ शेअर केला. ‘हॅपी बर्थ डे सोना... आय लव्ह यू... तुला खूप सारं फूड, फाईट्स आणि लाफ्टर’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं. जहीरच्या या पोस्टला सोनाने सुद्धा रिप्लाय दिला. ‘थँक यू... लव्ह यू आणि मी तुला मारायला येतेय...,’ असं तिने लिहिलं आहे. जहीरच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी लव्ह इमोजी पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.
जहीर व सोनाला अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. अलीकडे एका लग्नात दोघं एकत्र दिसले होते. दोघंही मॅचिंग ड्रेसमध्ये लग्नाला पोहोचले होते.सोनाक्षी सिन्हा व जहीर इक्बाल लवकरच ... या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात हुमा कुरैशीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. जहीरबद्दल सांगायचं तर त्याने ‘नोटबुक’ या चित्रपटातून डेब्यू केला होता.