अभिनेता जहीर इक्बाल व अभिनेत्री प्रनुतन बहल लवकरच 'नोटबुक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप भावला आहे. या चित्रपटातून जहीर व प्रनुतन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. इतकेच नाही तर जहीरने या चित्रपटातील बुमरो या गाण्यातील महत्त्वाची स्टेप बसवली आहे.
'बुमरो' हे काश्मीरमधील लोकगीत आहे. या गाण्याबाबत जहीर खूप उत्सुक असून त्याने या गाण्यावर स्टेप्सदेखील बसवल्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जहीर या गाण्याचा सराव करत होता. त्यात त्याने बसवलेली स्टेप कोरियोग्राफर मुदस्सर खान यांना आवडली आणि त्यांनी जहीरने बसवलेल्या स्टेपला हिरवा कंदील दिला.याबाबत जहीर म्हणाला की, 'या चित्रपटातील 'बुमरो...' हे गाणे फेव्हरिट असून या गाण्याबाबत मी खूप उत्सुक आहे. या गाण्याच्या सरावावेळी मी केलेल्या स्टेप कोरियोग्राफरला आवडल्या आणि त्यांनी त्याच ठेवल्या. हे गाणे खूप छान चित्रीत झाले आहे.'
या सिनेमाचे अधिकाधिक चित्रीकरण हे काश्मीरमध्ये झाले आहे. 'नोटबुक' चित्रपटात २००७ सालातील कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तलवाच्या मध्यभागी असलेल्या एका शाळेवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.
सलमान खान फिल्म्स प्रस्तुत 'नोटबुक' चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कड यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमा खान, मुराद खेतानी व अश्विन वर्दे यांनी केली असून हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.