Join us  

जहीरच्या बहिणीने मिठी मारताच सोनाक्षीच्या डोळ्यात पाणी, भावूक व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:27 AM

सोनाक्षी सिन्हा काल मुंबईत बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकली. या लग्नसोहळ्यातील भावूक व्हिडीओ समोर आलाय (sonakshi sinha)

बॉलिवूडची 'दबंग' गर्ल अशी ओळख असलेली सोनाक्षी सिन्हा काल लग्नबंधनात अडकली. सोनाक्षीने तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत काल नोंदणी पद्धतीने विवाह केला. सोनाक्षीने पुढे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईंकासाठी रिसेप्शन ठेवलं होतं. सोनाक्षीच्या लग्नाचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच सोनाक्षीच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आलाय. यात जहीरची बहिण एक विधी करताना सोनाक्षीचे डोळे पाणावले. 

जहीरच्या बहिणीचा विधी अन् सोनाक्षी भावूक

सोनाक्षी आणि जहीर या नवविवाहीत दांम्पत्याचे विविध व्हिडीओ समोर येत आहेत. यापैकी एका व्हिडीओत पाहायला मिळतं की, जहीरची मानलेली बहिण भावाला आणि सोनाक्षीला एका कोचावर बसवून विधी करताना दिसते. विधी झाल्यावर ती सोनाक्षीला मिठी मारते. त्यामुळे सोनाक्षीच्या डोळ्यात पाणी येतं. ती डोळे पुसते. सोनाक्षीचा हा भावूक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

सोनाक्षी जहीरसोबत अडकली लग्नबंधनात

सोनाक्षी सिन्हाने २३ जून रोजी जहीर इक्बालसोबत सिव्हिल मॅरेज केले होते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रजिस्टर मॅरेज लग्नाचे फोटो शेअर केले होते. ऑफ व्हाइट कलरच्या साडीमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती. तिने आपला लूक साधा ठेवला. वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात धरून ती उभी असलेली दिसली. लग्नानंतर सोनाक्षीने नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींसाठी खास रिसेप्शन ठेवलं होतं.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हाबॉलिवूडजहीर इक्बाल