बॉलिवूड इंडस्ट्रीला अलविदा केलेली अभिनेत्री झायरा वसीम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर तिथल्या परिस्थितीवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने गंभीर प्रश्न सरकारला विचारले आहेत. तिने लिहिले की, इथल्या लोकांच्या स्वातंत्र्यावर कोणीही निर्बंध लावत आहेत.
झायरा वसीमने लिहिले की, काश्मीरी लोक अपेक्षा व ताणतणावातून जात आहेत. दुःख आणि निराशेच्यामध्ये शांततेचा खोटेपणा पसरावला जात आहे. इथल्या लोकांवर कुणीही निर्बंध लावत आहे. आम्हाला अशा परिस्थितीत का ठेवले आहे, आमच्यावर निर्बंध आहेत, आम्हाला डिटेक्ट केले जात आहे.
तिने पुढे म्हटलं की, आमचा आवाज दाबणं इतकं सोप्पे का आहे? आम्हाला अशा जगात का राहायचे आहे जिथे आमचे जीवन व इच्छाशक्तीला नियंत्रित, निर्धारीत आणि दबून रहावे लागत आहे? आमच्या आवाजाला बंद करणं इतकं सोप्पे का आहे? आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे इतके सोप्पे का आहे? आम्ही न घाबरता व चिंतेने सामान्य लोकांसारखे का राहू शकत नाही?
झायरा वसीमने लिहिले की, मला या जगाला विचारायचे आहे की दुःख व शोषणामध्ये तुमच्या स्वीकृतीमध्ये का बदल झाला आहे? मीडियाने इथली धुसर परिस्थिती सांगितली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, प्रश्न विचारा, आमचा आवाज दाबला आहे आणि कधी पर्यंत..आमच्यापैकी कोणालाही वास्तिवकेतेत माहित नाही.
झायराने दोन सिनेमात काम केल्यानंतर बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. यामागचे कारण तिने धर्मांपासून दुरावत असल्याचे सांगितले होते. सध्या ती सोशल मीडियावर सक्रीय असते आणि या माध्यमातून ती आपलं मत व्यक्त करत असते.