'धडक'च्या सेटवरचे जान्हवी आणि इशानचे फोटो पुन्हा एकदा झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 6:33 AM
करण जोहरचा आगामी चित्रपट 'धडक'चे काम सध्या जोरात सुरु आहे. सेटवर परतलेली जान्हवी कपूर या प्रोजेक्टसाठी आपला बराच वेळ ...
करण जोहरचा आगामी चित्रपट 'धडक'चे काम सध्या जोरात सुरु आहे. सेटवर परतलेली जान्हवी कपूर या प्रोजेक्टसाठी आपला बराच वेळ देते आहे. धडकच्या पुढच्या शेड्यूलसाठी जान्हवी, इशान खट्टर आणि चित्रपटाची टीम सध्या कोलकत्ताला पोहोचली आहे. कोलकत्तामध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो लीक झाले आहेत. उदयपुरच्या सुंदर लोकेशन्सवर आणि मुंबईतल्या स्टुडिओमध्ये चित्रपटाची शूटिंग केल्यानंतर इशान आणि जान्हवी कोलकत्तातल्या प्रसिद्ध विक्टोरिया मेमोरियलजवळ शूट करतायेत. मीडियाकडे आलेल्या या फोटोंमध्ये दोघे एकमेकांशी बोलण्यात मग्न दिसतायेत. दोघांमध्ये एक चांगले बॉन्डिंग दिसते आहे. चित्रपटाच्या शूटिंगनंतर अनेक वेळा दोघे एकत्र डिनरवर स्पॉट झाले आहेत. शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटाच्या सेटवरचे फोटो अनेकवेळा लीक झाले आहेत. यामुळे मेकर्स कंटाळले आहेत. मेकर्सना या चित्रपटातील सस्पेंस आणि एक्साइटमेंट तशीच ठेवायची आहे. सतत फोटो लीक झाल्यामुळे करण जोहरने चित्रपटाच्या सेटवरची सुरक्षासुद्धा वाढवली होती. सेटवर फोन घेऊन जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही सेटवरचे फोटो लीक झाले आहेत. धडक हा मराठी चित्रपट 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं.सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या.त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. यात इशान परश्या तर जान्हवी आर्ची बनून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या मुलीच्या लॉँचिंगची जबाबदारी करण जोहरवर सोडली होती. श्रीदेवींनी या चित्रपटासाठी जान्हवीला खास तयार केले होते. जान्हवीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून डान्सिंग क्लासपर्यंत सगळ्यांवर श्रीदेवींची नजर असायची. मुलीचा डेब्यू सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी आतूर होत्या. मात्र ते कदाचित त्यांच्या नशीब नव्हते. येत्या 6 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. ALSO READ : पहिल्यांदाच सावत्र भाऊ अर्जुन कपूरच्या घरी गेल्या जान्हवी आणि खुशी कपूर!