Join us

'मुंबईत दिसली झेब्रा कपूर', करीना कपूरचे कपडे पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 12:13 IST

करीना कपूर खान अमृता अरोरासोबत नुकतीच करण जौहरच्या घरी जाताना दिसली. त्यावेळी तिने झेब्रा आउटफिट्स परिधाने केले होते.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. डिलेव्हरीच्या काही दिवसांनंतर करीना कपूर खानने पुन्हा एकदा नॉर्मल लाइफ जगते आहे. तसेच ती सोशल मीडियावर एक्टिव्ह झाली आहे आणि दुसरीकडे तिचे रिअल लाइफमध्येदेखील ती पुन्हा एकदा सोशल झाली आहे. दरम्यान करीना कपूर खान नुकतेच करण जौहरच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने परिधान केलेल्या आउटफिटमुळे ट्रोल झाली.

खरेतर काल रात्री करीना कपूर खान तिची मैत्रीण अमृता अरोरासोबत करण जौहरच्या घरी गेली होती. यादरम्यान करीनाने झेब्रा प्रिंट आउटफिट्स परिधान केले होते.

एकीकडे तिचा अवतार चाहत्यांना खूप भावला तर दुसरीकडे करीना कपूरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. काही लोकांनी तिची तुलना झेब्राशी केली आणि तिला झेब्रा कपूर असे संबोधले.

करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी २१ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या बाळ्याचे आगमन झाले होते. हे दोघे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले होते. हे वृत्त समोर आल्यानंतर सैफ, करीनासोबत तैमूरलाही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय करीना करण जौहरच्या तख्त सिनेमातही झळकणार आहे. याशिवाय आता लवकरच ती कमबॅक करण्याची शक्यता आहे. सध्या ती स्क्रीप्ट फायनल करत असल्याचे समजते आहे.

टॅग्स :करिना कपूरअमृता अरोरा