बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे झीनत अमान (Zeenat Aman). 70-80 च्या काळात झीनत अमान यांनी आपल्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळे त्याकाळी तरुणांच्या ओठावर बऱ्याचदा त्यांचं नाव येताना दिसायचं. मात्र, कालांतराने झीनत यांचा
कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, त्यांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. त्यामुळेच सध्या त्यांचं बॉसी लूकमधील एक फोटोशूट चर्चेत आलं आहे.बॉलिवूडपासून दूर गेलेल्या झीनत आमन सोशल मीडियावर सक्रीय झाल्या आहेत. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. त्यामुळे वरचेवर त्या नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यात नुकतंच त्यांनी नवीन फोटोशूट केलं आहे.
झीनत अमान यांनी ब्लॅक ब्लेझर, पँट, आणि त्यावर व्हाइट टी शर्ट अशा लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. सोबतच त्यांनी सनग्लासेस परिधान केल्यामुळे त्यांचा लूक आणखीनच खुलून आला आहे. विशेष म्हणजे वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी केलेलं हे फोटोशूट क्लास झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा बोल्डनेसपणा पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.