Join us

लग्न ही माझी खूप मोठी चूक होती..., झीनत अमान यांनी सांगितला होता शॉकिंग अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 11:25 AM

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या झीनत अमान यांनी एक काळ गाजवला. प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही झीनत चर्चेत राहिल्या.

ठळक मुद्दे80 च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या होत्या.  मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या झीनत अमान (Zeenat Aman) यांनी एक काळ गाजवला.  सत्यम शिवम सुंदरम,  डॉन,  कुबार्नी, हरे रामा हरे क्रिष्णा यांसारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही झीनत चर्चेत राहिल्या. झीनत त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी बोलतात. पण  अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत झीनत पहिल्यांदा खासगी आयुष्याबद्दल बोलल्या होत्या. लग्न ही मी आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक होती, असं त्या म्हणाल्या होत्या.

लग्नानंतरची ती 12 वर्ष तुमच्यासाठी कशी होती? असा प्रश्न सिमी यांनी झीनत यांना केला होत्या. यावर त्या म्हणाल्या होत्या की, ‘लग्नं झालं आणि वर्षभरातचं लग्न करून मी चूक केलीये, हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. पण तरीही हे लग्न निभवायचं, असा विचार मी केला. लग्नानंतर मी पडद्यावरून हळूहळू गायब झाले. मी माझ्या जबाबदाºया चोख बजावत होते. परंतु तरी देखील मजहर आणि माझ्यात खटके उडत होते. त्याचं आणखी एका दुस-या तरुणीसोबत अफेअर होतं.  मी गरोदर होते. परंतु त्यावेळी देखील माझी काळजी घेणारं कोणी नव्हतं. त्यानंतर आम्हाला एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर पहिल्याच दिवशी आता निर्णय घ्यायची वेळ आलीये, असं मी ठरवलं होतं. पण पुन्हा मी निर्णय पलटवला. मुलाच्या जन्मानंतर तरी आमच्या नात्यातील दुरावा संपेल, असं मला वाटतं होतं. परंतु तसं काही झालं नाही...’

80 च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा रंगल्या होत्या.  मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. 1985 मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्यासोबत लग्न केले. पण झीनत आणि मजहर यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते.  लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत. असे म्हणतात की, मजहर झीनत यांना मारहाण करायचे.दोन मुले आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताजसोबत दुसरे लग्न केले. ही गोष्ट झीनत यांच्या जिव्हारी लागली आणि झीनत यांनी मजहर यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत मजहर किडनीच्या आजाराने अंथरूणाला खिळले होते. घटस्फोट होण्याआधीच मजहर यांचे निधन झाले.

टॅग्स :झीनत अमान