मुंबई - २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार किंग खान शाहरुखचा चित्रपट झीरोच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर ३० नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचं उच्च न्यायालयाने निश्चित केले आहे. अमृतपाल सिंग खालसा यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने अर्धवट कपडे परिधान करून गळ्यात पैशाची माळ घालून कृपाण धारण केल्याने शीख समुदाय नाराज असल्याने ते आक्षेपार्ह दृश्य सिनेमातून हटविण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच झीरो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत कृपाणचा वापर केला आहे. किरपान हे शीख धर्मियांमध्ये पवित्र मानले जात असून शीख धार्मिक ते धारण करतात. मात्र, या पोस्टरमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखविल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.