शाहरुख खान, कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मा यांचा ‘झिरो’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. पण रिलीजनंतर काही तासांतच ‘झिरो’च्या मेकर्सला धक्का बसला. होय, चित्रपट रिलीज होऊन काही तास होत नाही तोच ‘झिरो’ आॅनलाईन लीक झाला. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’चे काही सीन्स फेक ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले गेलेत.
आत्तापर्यंत तमिलरॉकर्स वा टोरेंंट फ्री डाऊनलोड साईट्सवरून चित्रपट लीक होत आले आहेत. पण प्रथमच फेक ट्विटर हँडलवरून चित्रपटाचे सीन्स लीक झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. राज बन्सल नामक एका ट्विटर हँडवरून ‘झिरो’च्या सीन्सची एक व्हिडिओ क्लिपही शेअर झाली आहे. मनोज बाजपेयी नामक एका ट्विटर अकाऊंटनेही ‘झिरो’चे सीन्स लीक केले आहेत. गिरीश जौहर, अनुपमा चोप्रा, राजीव मसंद, कोमल मेहता, राहुल राऊत या ट्रेड अॅनालिस्टच्या नावांच्या फेक अकाऊंटवरूनही ‘झिरो’ लीक करण्यात आला आहे. तूर्तास ‘झिरो’च्या मेकर्सकडून याबाबत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. आता मेकर्स यावर काय कारवाई करतात, ते बघूच.
शाहरुखच्या ‘झिरो’ या चित्रपटाचा बजेट २०० कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. आज ओपनिंग डेला हा चित्रपट किती कमाई करतो, प्रेक्षकांना शाहरूखचा अंदाज किती भावतो, हे लवकरचं कळणार आहे. ‘झिरो’ या चित्रपटात कॅटरिना कैफ बबीता कुमारीची भूमिका साकारते आहे.अनुष्का शर्माही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ह्यझिरोह्ण या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे.