झिरो ठरला श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 9:39 AM
श्रीदेवीने एक बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या चवथ्या वर्षी तिने एका दाक्षिणात्य चित्रपद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ...
श्रीदेवीने एक बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या चवथ्या वर्षी तिने एका दाक्षिणात्य चित्रपद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. श्रीदेवीने तिच्या कारकिर्दीत अनेक बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. बॉलीवूड मधील सुरुवातीच्या तिच्या अनेक चित्रपटसाठी अभिनेत्री रेखाने डब्बिंग केले होते. सदमा, चालबाज, लमहे, नगीना, इंग्लिश विंग्लिश, चांदनी यांसारखे अनेक हिट चित्रपट तिने बॉलीवूडला दिले आहेत. इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाद्वारे तिने दीड दशकानंतर बॉलीवूड मध्ये पुनरागमन केले. तिचा हा चित्रपट देखील चांगलाच गाजला. या चित्रपटानंतर तिने मॉम या चित्रपटात काम केले आहे. मॉम या चित्रपटातील तिने साकारलेली आई प्रेक्षकांना चांगलीच भावली. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील 300 वा चित्रपट ठरला. मॉम हा चित्रपट प्रदर्शित होऊन वर्ष उलटून गेले आहे. या चित्रपटानंतर आता श्रीदेवी झिरो या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. झिरो हा श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटात ती एक पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटात कोणतीही व्यक्तिरेखा साकारणार नसून ती श्रीदेवी म्हणूनच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एका पार्टी च्या दृश्यात ती दिसणार असून या दृश्यात तिच्यासोबत आलिया भट आणि करिश्मा कपूर देखील आहेत. झिरो या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. शहरुखसोबत श्रीदेवीने आर्मी या चित्रपटात काम केले होते. में तो हूं पागल मुंडा हे शाहरूख आणि श्रीदेवी वर चित्रित झालेले गाणे चांगलेच गाजले होते.Also read : मृत्यूपूर्वी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या श्रीदेवी