Join us

​दिलजीत दोसांजने गायले सैराटमधील झिगांट गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 6:20 AM

फिल्लोरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ​दिलजीत दोसांज आणि अनुष्का शर्मा लोकमतच्या ऑफिसमध्ये आले असता दिलजीतने सैराटमधील झिंगाट गाणे गायले. दिलजीत पंजाबी असूनही त्याचे मराठी चित्रपटांवर प्रचंड प्रेम आहे. सैराट तर त्याचा आवडता चित्रपट आहे.

फिल्लोरी या चित्रपटात दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटात तो अनुष्का शर्मासोबत झळकत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच लोकमतच्या ऑफिसमध्ये आला होता. दिलजीत हा मुळचा पंजाबी असून त्याने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो पंजाबी असला तरी त्याला मराठी चित्रपटांविषयी प्रेम आहे. सैराट हा तर त्याचा आवडता चित्रपट आहे. सैराटमधील सगळीच गाणी त्याला प्रचंड आवडतात. पण त्यातही झिंगाट या गाण्याचा तो चाहता आहे. हे गाणे त्याने लोकमतच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना गावून दाखवले. दिलजीतला मराठी येत नसले तरी झिंगाट या गाण्याचे बोल मोबाइलमध्ये वाचत त्याने हे गाणे गायले. दिलजीत झिंगाट गाताना स्वतः झिंगाट झाला होता. त्याने हे गाणे अप्रतिम गायले.दिलजीत अनेक वर्षं पंजाबी चित्रपटात काम करत आहे. त्याच्या पंजाबी चित्रपटातील भूमिका गाजल्यानंतर त्याला बॉलिवूडच्या अनेक ऑफर्स मिळायला लागल्या. त्याने गेल्या वर्षी उडता पंजाब या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेचे सगळ्यांनी कौतुक केले. आता तो फिल्लोरी या चित्रपटात काम करण्यासोबतच रायझिंग स्टार या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे.दलजीत हा एक गुणी अभिनेता असण्यासोबतच एक चांगला गायकदेखील आहे. त्याने अनेक पंजाबी गाणी गायली आहेत. त्याचे अनेक अल्ब्मसदेखील प्रसिद्ध आहेत. त्याने पंजाबी गाण्यांसोबत हिंदी गाणीदेखील गायली आहेत. तेरे नाल लव्ह हो गया, मेरे डॅड की मारुती, यमला पगला दिवाना 2, सिंग इज ब्लिंग, उडता पंजाब यांसारख्या चित्रपटातील त्याची गाणी गाजली आहेत.