Join us

हृतिकमुळं मी मरणारच होतो ना भाऊ...! अभय देओलनं सांगितला ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’चा थरारक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 2:38 PM

Off The Record with Abhay Deol : अभय देओलने इतक्या वर्षानंतर सांगितला त्या दिवशीचा जीवावर बेतणारा प्रसंग

ठळक मुद्दे ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास ९ वर्षे उलटली असली तरी चाहते तितक्याच आनंदाने आजही पाहतात.

बॉलिवूडचा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ (Zindagi Na Milegi Dobara) हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. या सिनेमाने फक्त मनोरंजन केलं नाही तर बरंच काही शिकवलं. आयुष्यात कितीही समस्या असोत, अडचणी असोत पण तरिही आयुष्य आनंदात जगात येतं, हे हृतिक रोशन (Hrithik Roshan ), फरहान अख्तर (Farhan Akhtar), अभय देओल असा संदेश या सिनेमाच्या माध्यमातून या त्रिकुटाने दिला. पण तुम्हाला ठाऊक आहे का? या सिनेमाचा एक सीन शूट करताना अभय व फरहान अगदी मरता मरता वाचले होते. इतक्या वर्षानंतर अभय देओलने (Abhay Deol) एका व्हिडीओद्वारे हा थरारक किस्सा सांगितला आहे.  

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ची निर्माती जोया अख्तरने अलीकडे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चित्रपटातील काही आॅफस्क्रीन दृश्य दाखवण्यात आली आहेत. यापैकी एका सीनमध्ये हृतिक, फरहान आणि अभय बार्सिलोना ते कोस्टा ब्रावा प्रवास करत असतात. हृतिक गाडी चालवत असतो. दरम्यान हृतिकला ऑफिसमधून एक फोन येतो. फोनवर बोलण्यासाठी तो गाडी घाटात रस्त्याच्या बाजूला लावतो आणि गाडीतून खाली उतरतो. पण हृतिक गाडीतून उतरताना गाडी बंद करायला विसरतो. हृतिक खाली उतरताच गाडी पुढे सरकते. फरहान गाडीतून उडी मारतो आणि गाडीत बसलेला अभय घाबरतो. इतक्यात हृतिक पटकन येऊन गाडी बंद करतो. 

या प्रसंगाबद्दल अभयन व्हिडीओमध्ये आपला अनुभव सांगितला आहे. तो म्हणाला, तो सीन करताना आम्ही मरता मरता वाचलो होतो़ हृतिकमुळे मी आणि फरहान मरणारच होतो. फरहान खूप फास्ट आहे. त्यामळें लगेच त्यानं उडी मारली. पण मी गाडीत अडकलो. त्याचा हा अनुभव ऐकून त्याच्यासोबत असलेले इतर कलाकार हसून त्याची भीती दूर करताना दिसत असल्याचे या व्हीडिओ मध्ये पाहायला मिळत आहे.

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 9 वर्षे उलटली असली तरी चाहते तितक्याच आनंदाने आजही पाहतात. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा चित्रपट सगळ्यांना माहित असेलच. तीन मित्र एका रोड ट्रीपला जातात. त्यातले त्यांचे अनुभव, त्यांनी एकत्र केलेली धम्माल आणि त्यातून शिकवलेले काही धडे अशा सगळ्याचं मिश्रण असलेला हा चित्रपट होता.

 

टॅग्स :अभय देओलहृतिक रोशनफरहान अख्तर