बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानीने कोरोना व्हायरसवर मात केल्यानंतर आता ती दुसऱ्या लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. कोरोनातून पूर्णपणे बरी झाल्यानंतर आता झोयाने 20 दिवसात आता दुसऱ्यांदा प्लाझ्मा डोनेट केले आहे. त्यामुळे आता इतर कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केला जाऊ शकेल. तिने ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
झोयाने सोशल मीडियावर प्लाझ्मा डोनेशनचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करुन झोया म्हणाली की, 'प्लाझ्मा डोनेशन राऊंड 2. मागील वेळी याने एका रुग्णाला आयसीयुमधून बाहेर येण्यासाठी मदत केली होती. माझ्या डॉक्टरकडून एक नोट- आशा आहे की, नीट झालेले सर्व रुग्ण मदतीसाठी पुढे येतील.
तिची बहिण शाजा मोरानी आणि वडिल करीम यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तिघांनीही यावर मात केली आहे.