बॉलिवूड दिग्दर्शिका झोया अख्तर एक प्रतिभावान दिग्दर्शिका आहे, यात जराही शंका नाही. त्यामुळेचं सिनेप्रेमी तिच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत असतात. ‘लक बाय चान्स’ असो की ‘गली बॉय’, झोयाने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. काल रिलीज झालेल्या ‘गली बॉय’ने तर बॉक्सआॅफिसवर धूम केलीय. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम रचलेत. पहिल्या दिवशीचे ओपनिंग बघता रणवीर सिंग व आलिया भट्ट स्टारर ‘गली बॉय’ सुपरहिट ठरणार, यात वाद नाही आणि आता हा चित्रपट हिट होताच झोयाने आपल्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु केलीये. होय, तिच्या या नव्या चित्रपटाबद्दल कळल्यावर चाहत्यांच्याही उत्साहाला उधाण येईल. विशेष म्हणजे, या आगामी चित्रपटासाठी झोया हृतिक रोशनला साईन करतीये.
‘गली बॉय’ हिट होताच झोया अख्तरने केली नव्या चित्रपटाची घोषणा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 13:04 IST