प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांची लेक झोया अख्तर (Zoya Akhtar) उत्तम दिग्दर्शिका आहे. तिने दिग्दर्शित केलेला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' प्रेक्षकांचा आवडता सिनेमा आहे. नुकतंच झोयाने एका मुलाखतीत सेन्सॉर वर निशाणा साधला. सिनेमात रेप सीन्स दाखवू शकता पण किस नाही? असा सवाल तिने उपस्थित केला. नक्की काय म्हणाली झोया वाचा.
झोया अख्तर नुकतीच वडील जावेद अख्तर यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी झोया म्हणाली, "फिजीकल इंटिमसीवरील सेन्सॉरशिप हटवली गेली पाहिजे. मला माहित आहे जर ही सेन्सॉरशिप हटवली तर इथे असे काही लोक आहेत जे नको नको ते बघतील. पण मला वाटतं सिनेमांमध्ये कंसेन्शुअल इंटिमसी दाखवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की लहान मुलांनीही कंसेन्शुअल इंटिमसी पाहून मोठं व्हावं."
ती पुढे म्हणाली, "मी जे चित्रपट पाहून मोठी झाले त्यात रेप सीन शोषण मारहाण, धमकी असे सीन्स दाखवण्यात आले आहेत. म्हणजे हे किती विचित्र आहे की लहान मुलं हे बघू शकतात त्यांना ही परवानगी आहे पण किसींग सीन्स बघू शकत नाहीत? "
झोयाच्या या वक्तव्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. याशिवाय तिने अमेरिकन लोकांच्या तुलनेत फ्रेंच लोक पुरुषांच्या न्युडिटीबाबात जास्त ओपन असल्याचंही म्हणलं. आपण जे लस्ट स्टोरीज मध्ये दाखवलं ते जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये करणार नाही असंही ती म्हणाली.