Join us

बॉलिवूडचे 7 उच्चशिक्षित सेलिब्रिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2018 4:03 PM

आज आम्ही तुम्हाला याच तुमच्या लाडक्या कलाकारांच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत. खालील तुमचे आवडते कलाकार हे बॉलिवूडमधील उच्चशिक्षित कलाकार आहेत. 

बॉलिवूडच्या कलाकारांच्या खाजगी गोष्टी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता बघायला मिळते. ते कुठे राहतात? कसे राहतात? त्यांची टोपण नावं काय? या गोष्टींची सर्वांनाच उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला याच तुमच्या लाडक्या कलाकारांच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत. खालील तुमचे आवडते कलाकार हे बॉलिवूडमधील उच्चशिक्षित कलाकार आहेत. 

1) परिणीती चोप्रा

अभिनेत्री परिणीती चोप्रा हीच्याकडे बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ट्रीपल ऑनर डिग्री आहे. परीने ही डिग्री मॅन्चेस्टर बिझनेस स्कूल, यूके येथून मिळवली आहे.  

2) अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी दिल्लीच्या किरोरीमल कॉलेजमधून आर्ट आणि सायन्स अशा दोन्ही डिग्री घेतल्या आहेत. इतकेच नाहीतर त्यांना क्वींसलैंड यूनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया सहीत अनेक यूनिव्हर्सिटींनी डॉक्टरेट ही मानद पदवी दिली आहे.

3) प्रिती झिंटा

प्रिती झिंटाने शिमला येथील सेंट बेडेस् कॉलेजमधून इंग्रजीतून डिग्री मिळवली आहे. तर मास्टर डिग्री क्रिमिनल सायकॉलॉजीमधून केली आहे. 

4) शाहरुख खान

शाहरुख खानने याने दिल्लीतील हंसराज कॉलेजमधून डिग्री मिळवली. त्यानंतर त्याने मास मीडियात दिल्लीच्याच जमिया मिलिया इस्लामियामधून मास्टर डिग्री मिळवली.

5) सोहा अली खान

सोहा अली खानने मॉडर्न हिस्ट्री या विषयात बॅचलर डिग्री   Balliol College, Oxford येथून मिळवली. आणि त्यानंतर तिने इंटरनॅशनल रिलेशन या विषयात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्समधून मास्टर्स केलं आहे.  

6) जॉन अब्राहम

अभिनेता जॉन अब्राहम याने मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून इकॉनॉमिक्स विषयात डिग्री मिळवली. त्यानंतर त्याने मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधून एमबीए केलं.

7) रणदीप हुडा

रणदीप हुडा याने मार्केटींगमधून डिग्री घेतली. त्यानंतर त्याने पोस्ट ग्रॅज्यूएशन बिझनेस मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्समधून ऑस्ट्रेलियातून केलं.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी