Join us

बॉलिवूडचेधुरंदर ‘वकील’

By admin | Published: February 04, 2017 3:09 AM

कोर्ट-कचेरी, वकील, न्यायाधीश हे शब्द जरी कानावर पडले तरी थरकाप होतो. मात्र, जेव्हा पडद्यावर कोर्ट ड्रामा रंगतो, तेव्हा मात्र तो बघावासा वाटतो. वास्तविक न्यायालयात

- Satish Dongare

कोर्ट-कचेरी, वकील, न्यायाधीश हे शब्द जरी कानावर पडले तरी थरकाप होतो. मात्र, जेव्हा पडद्यावर कोर्ट ड्रामा रंगतो, तेव्हा मात्र तो बघावासा वाटतो. वास्तविक न्यायालयात रंगणारा खटला अन् पडद्यावर रंगणारा खटला यात बराच फरक आहे. पण, काहीही असो ज्या पद्धतीने पडद्यावर कोर्ट ड्रामा रंगविला जातो, तो प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा असतो हे नक्की. अर्थातच यात वकिलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांचा दमदार आवाज अन् त्याचे चातुर्य भावणारे असते. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये बरेचसे अभिनेते वकिलांच्या भूमिकेत झळकले आहेत; मात्र काही अशा भूमिका आहेत, ज्या कायमस्वरूपी स्मरणात आहेत. ‘जॉली एलएलबी-२’ मध्ये अक्षयने अशीच अविस्मरणीय भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे. सनी देओल‘तारीख पे तारीख, तारीख पे तारीख’ हा डायलॉग कोणाला माहीत नसेल, असे म्हणणेच बहुधा चुकीचे ठरेल. ‘दामिनी’ मध्ये अ‍ॅडव्होकेट गोविंदाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलने खऱ्या अर्थाने ही भूमिका अजरामर केली आहे. कोर्टातील डावपेच, संवाद, अ‍ॅग्रेसिव्हपणा, प्रतिस्पर्धी वकिलाची खिल्ली अशा सर्वच खुबी या भूमिकेतून सनी देओलमध्ये बघावयास मिळाल्या. या भूमिकेसाठी सनी देओलला सहायक अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. गोविंदा‘क्यों की मैं झूठ नही बोलता’ या सिनेमात गोविंदाने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांना आठवते. आपल्या अंदाजात तो कोर्टात खऱ्याचं खोटं सिद्ध करण्यात कसा यशस्वी होतो, हे दाखविण्यात आले होते. गोविंदाचा हा अंदाज त्यावेळेस प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. अनिल कपूर‘जीत जायेंगे हम, तू अगर संग है’ हे सुपरहिट गीत असलेल्या ‘मेरी जंग’ या सिनेमातील अनिल कपूर याने साकारलेल्या अ‍ॅडव्होकेट अरुण वर्माची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अ‍ॅड. जी. डी. ठकरालच्या भूमिकेत असलेल्या अमरिश पुरी यांचाही अभिनय त्यावेळेस कौतुकास्पद ठरला होता. त्यामुळे जेव्हा केव्हा वकिलांशी संबंधित सिनेमांचा उल्लेख केला जातो, तेव्हा ‘मेरी जंग’ हा सिनेमा प्रकर्षाने समोर येतो. हा सिनेमा १९८५ मध्ये रिलिज झाला होता. मात्र, आजही तो प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.