Join us

बॉलीवूडची सर्वात महागडी ‘क्वीन’

By admin | Published: August 23, 2015 4:03 AM

कंगना राणावतने एका सिनेमासाठी 11 कोटी मानधन मागितल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र, तिला एवढी मोठी रक्कम देण्यात आली किंवा नाही याचा अद्याप खुलासा झालेला नाही.

कंगना राणावतने एका सिनेमासाठी 11 कोटी मानधन मागितल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र, तिला एवढी मोठी रक्कम देण्यात आली किंवा नाही याचा अद्याप खुलासा झालेला नाही. कंगनाने आपली फीस वाढविल्याचे आता सर्वच मान्य करू लागले आहेत. बॉलिवूडमधील कोणत्याच अभिनेत्रीने एवढी मोठी रक्कम अद्याप मागितलेली नाही. कॅटरिना कैफ, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण यांचे एका चित्रपटाचे मानधन 5 कोटी रुपये आहे तर सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर 3 कोटी, श्रद्धा कपूर व आलिया भट्ट 1 कोटी मानधन घेत असल्याचे सांगितले जाते. काही अभिनेत्रींचे शुल्क कोटीच्या खालीच आहे. कंगना सध्या बॉलिवूडची सर्वांत महागडी अभिनेत्री ठरली आहे. परंतु यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. ‘तनू वेड्स मनू रिटर्न’ व ‘क्वीन’ हे दोन चित्रपट सुपरहिट ठरल्याने तिने आपले मानधन वाढविले आहे. हिट सिनेमे देणारे स्टार आपली किंमत वाढवितात असा बॉलिवूडचा इतिहास आहे.अभिनेते व अभिनेत्रीच्या मानधनाचा मुद्दा देखील वेळोवेळी उपस्थित करण्यात येतो. ‘पीकू’नंतर दीपिकाने, ‘मेरी कोम’नंतर प्रियंकाने मानधनाच मुद्दा उपस्थित केला होता. कंगनानेही याला हवा दिली होती. तिने जरी आपल्या मानधनाचा मुद्दा समोर केला असला तरी देखील ती आपल्या स्टँडवर कधीपर्यंत कायम राखते हे पहावे लागणार आहे. येणारा काळ याचे उत्तर देईलच. लवकरच कांगनाचा ‘कट्टी-बट्टी’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यात इम्रान खान सोबत ती दिसेल. या चित्रपटाचे यश पुन्हा एकदा तिच्या मानधनावर चर्चा करायला लावेल हे नक्की. हा सिनेमा फ्लॉप झाला तर ती आपल्या स्टँडवर कायम राहणार का हा खरा मुद्दा आहे. कं गनाच्या मागणी मागे तिचे यशस्वी चित्रपट आहेत. तिच्या चित्रपटांंनी कोट्यवधींची कमाई केली आहे. यशस्वी नायक हिट सिनेमाच्या नफ्यातही आपला हिस्सा मागतात. नायिकांना असे काहीच मिळत नाही. दुसरीकडे हिरो-हिरोईन्सच्या भविष्याचा फैसला बाजार करतो असे म्हटले जाते. बाजारातील नियम सरळ आहे, तर तुम्ही यशस्वी आहात तर तुम्हाला नियम बनविण्याचा अधिकार मिळतो. अपयश आले की याच्या उलट होते. कंगनाने या दोन्ही परिस्थितींना जवळून पाहिले आहे. यामुळे उगवत्या सूर्याला सलाम करण्याची उक्ती तिला माहीत आहेच. सध्या कंगनाच्या करिअरचा सूर्य तळपतो आहे, यामुळे फीस वाढवून आपले तेज वाढविण्याची संधी ती कशाला सोडणार...?- anuj.alankar@lokmat.com