Join us

बॉलीवूडलाही चढलाय ‘टी-20 फिव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2016 2:09 AM

टी-20 विश्वकप स्पर्धेला अगदी धडाक्यात सुरुवात झाली आहे. जो-तो सध्या क्रिकेटच्या रंगात रंगला आहे. क्रिकेटची ही जादू बॉलीवूडच्याही सर चढ के बोलत आहे.

टी-20 विश्वकप स्पर्धेला अगदी धडाक्यात सुरुवात झाली आहे. जो-तो सध्या क्रिकेटच्या रंगात रंगला आहे. क्रिकेटची ही जादू बॉलीवूडच्याही सर चढ के बोलत आहे. टी-20 विश्वचषकाच्या सामन्यांचा आनंद लुटता यावा म्हणून बऱ्याच स्टार्सनी चक्क आपल्या शूटिंगचे शेड्यूल बदलून टाकले आहे, तर काहींनी आपल्या खास मित्रांना घरी बोलावून क्रिकेटचा आनंद लुटण्याचे प्लॅनिंग केले आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट...क्रिकेटवेड्या फिल्मस्टार्समध्ये सुनील शेट्टीचे नाव अगदी समोर आहे. अशा स्पर्धेदरम्यान सुनील अजिबात शूटिंग करीत नाही. तो सांगतो की, ज्या दिवशी क्रिकेट सामना असेल त्या दिवशी मी टीव्हीसमोरून हलतच नाही. सुनील शेट्टी एकमेव स्टार नाही की, जो क्रि केटचा महाशौकीन आहे. त्याच्यासारखीच किक्रेटची नशा आफताब शिवदासानीवरदेखील स्वार आहे. आफताबने मागील विश्वकपदरम्यान एका चित्रपटाची आॅफर फक्त यासाठी नाकारली होती, कारण सामन्यांची तारीख शूटिंगच्या दरम्यान येत होती. रितेश देशमुखचीही परिस्थिती तीच आहे. तो स्वत: क्रिकेट खेळण्याचा शौकीन आहे. तो सांगतो की, जेव्हा क्रिकेटचे सामने असतात, तेव्हा मला काहीच सुचत नाही. टी-20 वर्ल्डकपदरम्यान कुठलीच शूटिंग नको, याची काळजी रितेशनेही घेतली आहे. अनिल कपूरदेखील क्रिकेट सामन्यांच्या दिवशी आपले सगळे वेळापत्रक गुंडाळून ठेवतो. जॅकी श्रॉफचेदेखील असेच आहे. जेव्हा भारताचा सामना असतो तेव्हा जॅकी टीव्हीच्या समोरच ठाण मांडून बसतो. भारतीय टीम जिंकल्यानंतर जल्लोषही करतो. फरहान अख्तर, त्याचा पार्टनर रितेश, साजिद खान, जायद खान, सुशांत सिंह राजपूत (जो आगामी चित्रपटात धोनीची भूमिका करीत आहे) देखील क्रिकेटचे जबरदस्त फॅन आहेत. फक्त नायकच नव्हे, बॉलीवूडच्या नायिकादेखील क्रिकेटच्या कमी शौकीन नाहीत. भारतीय संघ खेळत असेल तेव्हा दिया मिर्झा अजिबात घराबाहेर जात नाही. तब्बूदेखील घरातच राहणे पसंत करते. अमृता अरोडा, अमिषा पटेल, जुही चावलापासून या काळातील श्रद्धा कपूर आणि आलिया भट्टसारख्या नायिकांसाठी क्रिकेटचे सामने जणू मेजवानीच असते.

- Feature

anuj.alankar@lokmat.com