Join us

‘मुन्नाभाई 3’ थंडबस्त्यात, बोमन इराणींनी केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 3:29 PM

काही दिवसांपूर्वी ‘मुन्नाभाई 3’ची चर्चा पुन्हा सुरु झाली होती. राजकुमार हिरानींनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु केल्याचेही मानले जात होते. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण आता...

ठळक मुद्देराजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ बनवल्यानंतर ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती.

बॉलिवूडचा बाबा संजय दत्त शिक्षा पूर्ण करून तुरुंगातून बाहेर आला अगदी तेव्हापासून ‘मुन्नाभाई 3’ची चर्चा सुरु आहे. यानंतर संजूबाबा जेव्हाकेव्हा मीडियासमोर आला, त्याला ‘मुन्नाभाई 3’विषयी प्रश्न विचारला गेला. काही दिवसांपूर्वी या सीरिजची चर्चा पुन्हा सुरु झाली होती. राजकुमार हिरानींनी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु केल्याचेही मानले जात होते. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण आता...? पण आता हा चित्रपट अर्थात हा प्रोजेक्ट बंद थंडबस्त्यात गेला आहे.

‘मुन्नाभाई’ सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांनी याबद्दल धक्कादायक खुलासा केला. ‘मुन्नाभाई 3’बद्दल विचारल्यावर ते म्हणाले,‘ हा चित्रपट कधी सुरु होणार, याबद्दल मला माहित नाही. ‘मुन्नाभाई 3’वर काम सुरु असल्याचे लोकांना वाटतेय. पण असे काहीही नाही. हा प्रोजेक्ट बंद झाला आहे. मेकर्सने कहाणी लिहिली होती. पण ती पहिल्या दोन भागांशी कुठेही मेळ खात नव्हती. त्यामुळे त्यांनी या कथेवर चित्रपट बनवण्याचा निर्णय रद्द केला. त्यांनी याच कथेवर आधारित चित्रपट बनवला असता तर एक सुमार चित्रपट बनला असता. यातून पैसा मिळाला असता. पण सन्मान नाही. ‘मुन्नाभाई 3’चा उद्देश केवळ गल्ला जमवणे हा नाही. लोकांना आवडेल असा तोडीस तोड चित्रपट मेकर्सला बनवायचा आहे.’

बोमन यांच्या या खुलाशानंतर ‘मुन्नाभाई 3’च्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे, हे नक्की.अर्थात असे पहिल्यांदा झालेले नाही. राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ बनवल्यानंतर ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती. पण या स्क्रिप्टबद्दल हिरानी स्वत: समाधानी नव्हते. अखेर त्यांनी हा चित्रपट न बनवण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात यानंतर ते ‘लगे रहो मुन्नाभाई’ घेऊन आले. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.

टॅग्स :बोमन इराणीसंजय दत्तराजकुमार हिरानी