२४ फेब्रुवारी, २०१८ हा दिवस कोणीच विसरू शकत नाही. या दिवशी अभिनेत्री श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे सिनेइंडस्ट्रीसोबतच सर्वांना धक्का बसला होता. तिच्या निधनाचे वृत्त हैराण करणारे होते. श्रीदेवाचा नवरा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूरवरश्रीदेवीच्या निधनानंतर खूप आरोप करण्यात आले होते. हे आरोप श्रीदेवीच्या जवळच्यांनी केले होते.
अभिनेत्री श्रीदेवी नवरा बोनी कपूरसोबत आपल्या कुटुंबातील एका लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईत गेली होती. जिथे अभिनेता अनिल कपूर आणि त्यांचे कुटुंब सामील झाले होते. सोशल मीडियावर लग्नातील कित्येक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यावेळी श्रीदेवी खूप आनंदी दिसत होती. मात्र २४ फेब्रुवारी, २०१८ ला सकाळी वृत्त आले की श्रीदेवीचे निधन झाले आहे. दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांची चौकशीदेखील केली. काही कालावधीनंतर त्यांना सोडले आणि श्रीदेवीचे पार्थिवर भारतात तिच्या मुले आणि कुटुंबाकडे पाठवून दिले.
श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनानंतर श्रीदेवीचे काका वेणूगोपाल समोर आले आणि त्यांनी खूप मोठे विधान केले. जे ऐकून लोक हैराण झाले. त्यांनी एका मुलाखतीत बोनी कपूरवर मोठे आरोप करत म्हटले की, ती खूप वेळापासून त्रस्त होती. ती खूप वेदनेतून जात होती. या मुलाखतीनंतर बोनी कपूरवर टीका होऊ लागली.
इतकेच नाही तर मुलाखतीत वेणुगोपाल रेड्डी यांनी सांगितले होते की बोनी कपूरचे काही सिनेमे फ्लॉप झाले होते. त्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी बोनी कपूरने श्रीदेवीची संपत्तीपण विकून टाकली होती. हीच गोष्ट श्रीदेवीला खूप बैचेन करत होती. तसेच श्रीदेवीला बोनी कपूरची अवस्था पाहवत नव्हती. त्यामुळेच श्रीदेवीने पुन्हा काम करायला सुरूवात केली होती.
श्रीदेवीच्या काकांच्या वक्तव्यामुळे आधीच लोक हैराण झाले होते. यादरम्यान बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता रामगोपाल वर्माने एक पत्र लिहिले होते. ज्यात त्याने बोनी कपूरवर खूप आरोप केले होते. रामगोपाल वर्माने आपल्या पत्रात लिहिले होते की, बोनी कपूरची आई नेहमीच श्रीदेवीची इमेज घर तोडणारी महिलेच्या रुपात दाखवली होती. इतकेच नाही बोनी कपूरच्या आईने श्रीदेवीच्या पोटावर फाइव्ह स्टारच्या लॉबीत जोरात ठोसा मारला होता.