प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर म्हणजे सब्यासाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee). कलाविश्वातील कोणत्याही सेलिब्रिटीचं लग्न असो वा अन्य कार्यक्रम प्रत्येक कलाकार त्यांच्या फॅशनेबल कपड्यांसाठी सब्यासाचीच्याच आऊटफिटला पहिली पसंती देतात.बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच काही विदेशी सेलिब्रिटीदेखील खास सब्यासाची यांच्याकडून पारंपरिक भारतीय कपडे डिझाइन करण्याची मागणी करतात.
आज सब्यासाची देशातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर असले तरीदेखील एकेकाळी त्यांनी प्रचंड हालाखीचं जीवन जगलं आहे. सब्यासाची हा आज मोठा ब्रँड आहे. परंतु हा ब्रँड सुरु करण्यासाठी सब्यासाची यांना उधारीवर पैसे घेतले होते. एका मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.
२३ फेब्रुवारी १९७४ साली कोलकाता येथे जन्म झालेल्या सब्यासाची यांचं प्राथमिक शिक्षण कोलकातामधील सेंट झेविअर्स स्कूलमध्ये झालं आहे. मध्यवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सब्यासाचीने कलाविश्वात काम करुन नये अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी सब्यासाची यांचा विरोध केला होता.
कुटुंबाचा विरोध पत्करुन सब्यासाची यांनी काही जणांकडून उधारीवर पैसे घेतले आणि त्यांचा ब्रँड सुरु केला.प्रचंड मेहनत आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर आज सब्यासाची कलाविश्वातील लोकप्रिय डिझायनर आहेत.
दरम्यान, सब्यासाची यांचे डिझाइन केलेले कपडे प्रचंड महाग असतात.सब्यासाची एका आलिशान घरात राहत असून त्यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्यादेखील आहेत. अलिकडेच आदित्य बिर्ला फॅशन अॅण्ड रिटेल लिमिटेड यांनी सब्यासाची यांच्या ब्रँडची ५१ टक्के भागीदारी खरेदी केली आहे. हे डील ३९८ कोटी रुपयांना झाल्याचं सांगण्यात येतं.