Join us

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, रविवारी केली बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 10:08 AM

१ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतो आहे. या चित्रपटाने एकापाठोपाठ अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 17 व्या दिवशी चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण सुरू झाली, त्यामुळे 'अ‍ॅनिमल'ची जादू फिकी पडली का असं वाटू लागलं, पण  रविवारी सिनेमा पुन्हा मुसंडी मारत जोरदार कमाई केली आहे. 

'अ‍ॅनिमलने शनिवारी 12.8 कोटी रुपयांची कमाई केली. तर रविवारी चित्रपटाने बम्पर कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाने रविवारी 15 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 512.94 कोटी झाले आहे. अ‍ॅनिमल हा रणबीर कपूरचा पहिला चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे, ज्याने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केली. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा या वर्षातील चौथा चित्रपट ठरला आहे. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर अ‍ॅनिमल'ने 800 कोटींच्यावर कमाई केली आहे.

'ॲनिमल' चित्रपटात रणबीरबरोबर बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरीच्या इंटिमेट सीन आणि काही डायलॉगमुळे या सिनेमाला ट्रोलही करण्यात आलं होतं. पण, याचा सिनेमाच्या कमाईवर काहीही परिणाम झालेला नाही.  

टॅग्स :रणबीर कपूररश्मिका मंदाना