दीर्घ प्रतीक्षेनंतर अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. कालच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटच्या (Alia Bhatt) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर पाहून रणबीर-आलियाचे फॅन्स क्रेझी झालेत. पण काही तासांनंतर ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड करू लागला. ट्रेलरमधील एक गोष्ट चाहत्यांना खटकली आणि याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.
नेमकं काय खटकलं?‘ब्रह्मास्त्र’मधील रणबीर आलियाची रोमॅन्टिक केमिस्ट्री चाहत्यांना आवडली. यातल्या व्हीएफएक्स सीन्सचंही चाहत्यांनी कौतुक केलं. ट्रेलरमधील अॅक्शन आणि अॅडव्हेंचर पाहून अनेकांनी ट्रेलरची तारीफ केली. पण या ट्रेलरमधील एक गोष्ट काही नेटकऱ्यांना खटकली. सध्या ट्विटरवर ट्रेलरचे काही स्क्रिनशॉट्स व्हायरल होत आहे. हे स्क्रिनशॉट्स एका सीनचे आहेत. यात रणबीर कपूर मंदिरात एन्ट्री करतो आणि उंच उडी मारत मंदिरातील घंटा वाजवतो. या सीनमध्ये रणबीरच्या पायात बूट आहेत. मंदिरात रणबीरला बूट घालून दाखवल्यानं चाहते नाराज आहेत. याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
‘पायात बूट घालून मंदिरातील घंटा वाजवली आहे. साऊथ आणि बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये हाच फरक आहे. साऊथ इंडस्ट्री आपल्या संस्कृतीचा आदर करते. याऊलट बॉलिवूड चित्रपट संस्कृतीचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही,’ अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया ट्विटर युजर्सनी दिल्या आहेत.
‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा येत्या 9 सप्टेंबरला रिलीज होतोय. हा सिनेमा बनवण्यासाठी अयान मुखर्जीला 8 वर्षांचा काळ लागला. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया व रणबीर पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. याच चित्रपटाच्या सेटवर रणबीर व आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अलीकडे दोघांनी लग्नगाठ बांधली.