Join us

अली फजलच्या जुन्या ट्विटने पेटला वाद, #BoycottMirzapur2 चा ट्व‍िटरवर ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 9:01 AM

आता 'मिर्झापूर २' च्या रिलीजची बातमी समोर येताच त्याच्या या सीरीजला टार्गेट केलं जात आहे. काही लोकांनी त्याच्यावर निशाणा साधत ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याची मागणी करू लागले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये 'मिर्झापूर' वेबसीरीज चर्चेचा विषय ठरत आहे. कारण पहिल्या सीझननंतर आता या सीरीज दुसरा सीझन २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या सीरीजच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण अशात अचानक 'मिर्झापूर २' बॉयकॉट करण्याची मागणी वर आली आहे. पण गेल्या २ वर्षांपासून जी सीरीज बघण्याची उत्सुकता वाढली होती त्या सीरीजचा लोक अचानक विरोध का करू लागले? तर याला कारणीभूत ठरलंय अभिनेता अली फजल याचं एक जुनं ट्विट.

गेल्यावर्षी CAA प्रोटेस्ट काळात अली फजल याने त्याचा 'मिर्झापूर' वेबसीरीजमधील एक डायलॉग वापरत ट्विट केलं होतं. त्याने लिहिलं होतं की, 'शुरू मजबूरी में किए थे, अब मजा आ रहा है.'. एक आणखी ट्विट त्याने केलं होतं की,  'याद रखें- अगला कदम ये साबित करना नहीं क‍ि ये एक शांतिपूर्ण आंदोलन था बल्क‍ि इसकी जांच करना और असली घुसपैठ‍ियों से पर्दा उठाना जो बाहर से इस आंदोलन में घुसे और हिंसा की.'. पण हे ट्विट त्याने नंतर  डिलीटही केले होते.

आता 'मिर्झापूर २' च्या रिलीजची बातमी समोर येताच त्याच्या या सीरीजला टार्गेट केलं जात आहे. काही लोकांनी त्याच्यावर निशाणा साधत ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याची मागणी करू लागले आहेत. एका यूजरने तर ही वेबसीरीज बॉयकॉट करण्यासाठी आणखी एक कारण दिलंय. तो म्हणाला की, 'मिर्झापूर २' चा एक्झिक्युटीव्ह प्रोड्यूसर फरहान अख्तर आहे.

एकीकडे मिर्झापूर २ बॉयकॉटची लहर सुरू आहे तर दुसरीकडे या सीरीजचे फॅन्सही कमी नाहीत. अनेक फॅन्सनी या वेबसीरीजला सपोर्ट केलाय आणि त्यावरून मजेदार मीम्सही तयार केलेत. आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे की, विरोधकांचं प्रमाण जास्त आहे की चाहत्यांची. तसेच या वेबसीरीजवर बॉटकॉटचा किती प्रभाव पडतो हेही बघावं लागेल. 

प्रतीक्षा संपली! 'मिर्झापूर २' या तारखेला होणार रिलीज, कालीन भैय्या आणि गुड्डू पंडित घेणार सूड

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजअली फजल