Brahmastra Collection Day 3: ‘ब्रह्मास्त्र’ अखेर ब्रह्मास्त्र ठरलं! होय, प्रचंड ट्रोलिंग, बायकॉट ट्रेंड याऊपरही रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटच्या ( Alia Bhatt ) ‘ब्रह्मास्त्र’ ( Brahmastra ) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने दमदार ओपनिंग घेतली आणि तीनच दिवसांत 100 कोटींचा आकडाही पार केला.
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडचे अनेक मोठे सिनेमे ‘बायकॉट’ ट्रेंडचे शिकार ठरले. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ असे सिनेमे सुपरडुपर फ्लॉप ठरले. आलिया व रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमाही ‘बायकॉट’ ट्रेंडचा बळी ठरतो की काय? अशी भीती त्यामुळेच व्यक्त होत होती. पण ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज झाला आणि या चित्रपटाने ही भीती निराधार ठरवली. तिसऱ्याच दिवशी हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला.
‘ब्रह्मास्त्र’ने ओपनिंग वीकेंडमध्ये सर्व भाषेत 122.58 कोटींचा बिझनेस केला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात बंपर ओपनिंगसह 37 कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 42 कोटींचा बिझनेस केला आणि तिसऱ्या दिवशी सर्व भाषांमध्ये 44.80 कोटींची कमाई केली. यात एकट्या हिंदी व्हर्जनने 41.5 कोटींची कमाई केली आहे. इतक्या ट्रोलिंगनंतर सिनेमानं ही केलेली ही बंपर कमाई पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचवाल्या आहेत. बॉयकॉट ट्रेंड, निगेटिव्ह रिव्ह्यूजचा ‘ब्रह्मास्त्र’वर कोणताही परिणाम न झाल्याचं चित्र आहे.
हिंदी व्हर्जनने कमावले इतके कोटी‘ब्रह्मास्त्र’ हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम व कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे. यापैकी सर्वाधिक कमाई हिंदी व्हर्जनने केली आहे. तिसऱ्या दिवशी 14.50 कोटींचं कलेक्शन केलं. तीन दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’च्या हिंदी व्हर्जनने एकूण 111.50 कोटींचा बिझनेस केला आहे. तीनच दिवसांत 100 कोटींची कमाई करत, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसला नवी संजीवनी दिली आहे.
मोडला रेकॉर्ड ओपनिंग वीकेंडमध्ये 100 कोटी बिझनेस करणारा ‘ब्रह्मास्त्र’ हा सातवा सिनेमा ठरला आहे. तर 100 कोटींची कमाई करणारा अभिनेता रणबीर कपूरचा दुसरा सिनेमा आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या ग्लोबल कमाईच्या आकड्यांबद्दल बोलायचं तर या सिनेमाचं ग्लोबल ओपनिंग कलेक्शन हे 210 करोड इतकं आहे.
आलिया-रणबीर खुश्शआलिया व रणबीर लवकरच आईबाबा होणार आहेत. त्याचा आनंद आहेच. पण सोबत ‘ब्रह्मास्त्र’ला मिळणारा हा प्रतिसाद बघता, दोघांचाही आनंद ओसंडून वाहतोय. रणबीरचा याआधीचा ‘शमशेरा’ सुपरडुपर फ्लॉप ठरला होता. पण ‘ब्रह्मास्त्र’ने ती कसर भरून काढली. त्यामुळे रणबीर व आलियाचा आनंद द्विगुणित झाला आहे. अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा 410 कोटी रूपयांत बनला आहे. आता या चित्रपटाला मंडे टेस्ट पास करायची आहे. आजच्या मंडे टेस्टमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ किती मार्कांनी पास होतो, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.