रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) व आलिया भटच्या (Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. केवळ तीनच दिवसांत चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. वर्ल्डवाईड कमाईबद्दल बोलाल तर चित्रपटाने 226.75 कोटींचा टप्पा गाठला आहे. या तुफानी कमाईने रणबीर व आलिया खुश्श आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चे मेकर्सही आनंदले आहेत. पण सोशल मीडियावरच्या युजर्सला काही केल्या ही गोष्ट पचत नाहीये. ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईचे आकडे खोटे आहेत, हेच मानून युजर्स आलिया व रणबीरला जबरदस्त ट्रोल करत आहेत.
ट्विटरवर #brahmastraboxoffice ट्रेंड होतोय. युजर्स खाली थिएटर्सचे व्हिडीओ व फोटो शेअर करत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चा निर्माता करण जोहर व दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनाही युजर्स ट्रोल करत सवाल करत आहेत. थिएटर्समध्ये प्रेक्षकच नाहीत तर कमाईचे आकडे कुठून आलेत? असा युजर्सचा सवाल आहे.
एका युजरने तर ‘ब्रह्मास्त्र’च्या बॉक्स ऑफिस कमाईवरून आलिया व रणबीरची ‘गजब बेइज्जती’ केली आहे. ‘हो राव, मी सहमत आहेत. इंडियात 350 कोटी, ओव्हरसीज कलेक्शन 150 कोटी, पृथ्वीवर 550 कोटी व दुसऱ्या ग्रहावर 760 कोटी, संपूर्ण ब्रह्मांडात 2500 कोटींचं कलेक्शन... खरंच मास्टरपीस सिनेमा आहे. ग्रेट स्टोरी, ग्रेट स्क्रीनप्ले...,’ अशा उपरोधिक शब्दांत या युजरने ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईच्या आकड्यांची खिल्ली उडवली आहे.
एका युजरने थिएटरमधील सीट बुकिंगचे स्क्रिनशॉट्स शेअर केला आहे. यात बहुतेक सीट्स रिकाम्या असल्याचं दिसते आहे. हा स्क्रिनशॉट शेअर करत, एका युजरने ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सची मजा घेतली आहे. ‘ब्रेकिंग!! ब्रह्मास्त्र 1 हजार कोटींकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी आपली सीट सोडून जमिनीवर बसून चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व सीट खाली दिसत आहेत. काय सिनेमा आहे...,’अशी कमेंट या युजरने केली आहे.
एका युजरची प्रतिक्रिया आणखीच मजेशीर आहे. ‘चित्रपटगृह खाली असतानाही 100 कोटींची कमाई कशी? ईडीने त्वरित तपास करायला हवा. अखेर ही कमाई होतेय कुठून?’, अशी मजेशीर कमेंट या युजरने केली आहे.
आलिया व रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा 8 हजार स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. 9 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दिवशी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 32 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 38 कोटी, तिसऱ्या दिवशी 41.5 कोटींचा गल्ला जमवला. हा एकूण आकडा 111.5 कोटींच्या घरात आहेत. वर्ल्डवाईड कलेक्शनचे आकडेही थक्क करणारे आहेत. तीनच दिवसांत या चित्रपटाने जगभर 225 कोटींची कमाई केली आहे. सर्व पाच भाषांत या चित्रपटाने तीन दिवसांत 122.58 कोटींचा एकूण बिझनेस केला आहे.