Brahmastra First Review: ‘ब्रह्मास्त्र’ ( Brahmastra ) हा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ड्रिम प्रोजेक्ट. हा सिनेमा बनायला चार वर्षे लागलीत. या काळात अनेकदा हा चित्रपट रखडला. पण आता ‘ब्रह्मास्त्र’ रिलीजसाठी सज्ज आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटची ( Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. रिलीजपूर्वी चित्रपटाचे प्रिव्ह्यू शो चाहत्यांसाठी आणि सिने पत्रकारांसाठी ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर चित्रपटाचे रिव्ह्यू समोर येतायेत. या चित्रपटाबद्दल समोर आलेल्या पहिल्या रिव्ह्यूमध्ये ब्रह्मास्त्र सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय.
आंतरराष्ट्रीय प्रकाशन व्हरायटीने ब्रह्मास्त्रला "सुपरहिरो" म्हटलं आहे. चित्रपट समीक्षक कोर्टनी हॉवर्ड यांनी देखील रणबीर आणि आलियाच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.
ब्रह्मास्त्राची पहिला रिव्ह्यू काय?व्हरायटीच्या रिव्ह्यूनुसार, "मुख्य भूमिकेत आलिया भट आणि रणबीर कपूर दोघेही खूप चार्मिंग दिसतात आणि दोघांची केमिस्ट्री तुम्हाला पडद्यावर खिळवून ठेवते. रणबीर कपूरचे डायलॉग्स खूपच दमदार आहे. तर आलिया भटनंही आपली भूमिका चोख निभावली आहे.
तब्बल 410 कोटी रूपयांत हा चित्रपट बनून तयार झाला. या चित्रपटात एकापेक्षा एक जबरदस्त व्हीएफएक्स सीन्स आहेत आणि हे सीन्स चित्रपटाचं बजेट वाढण्याचं एक मोठं कारण आहे. केवळ व्हीएफएक्स इफेक्टवरच 50 ते 57 कोटी रूपयांचा खर्च झाला आहे.
ब्रह्मास्त्र यात रणबीर कपूर व आलिया भट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हिंदीसह अनेक चार भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.