Join us

Brahmastra :  आरारारा रा खतरनाक!  79 वर्षांच्या ‘बिग बीं’ची जबरदस्त अ‍ॅक्शन, पाहा ‘ब्रह्मास्त्र’चा नवा टीझर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 5:00 PM

Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलर, गाण्यांना आणि टीझरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा नवा टीझर रिलीज झाला आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra ) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. रणबीर कपूर, आलिया भट, अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी राय अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटांच्या गाण्यांची झलकही तुम्ही पाहिली असेल. आता रिलीजच्या तोंडावर ‘ब्रह्मास्त्र’ची एक छोटीशी झलक करण जोहरने शेअर केली आहे. करणने शेअर केलेला हा टीझर पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

या टीझरमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या अस्त्राने शत्रूला ध्वस्त करताना दिसत आहेत. त्यांच्या एनर्जीपुढे अगदी रणबीरची एनर्जीही कमी वाटेल, अशा जबदस्त अ‍ॅक्शन लुकमध्ये पाहून तुम्हीही थक्क व्हाल.‘ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ रणबीरच्या गुरूंची भूमिका साकारत आहेत. बिग बी या चित्रपटात शिवाच्या गुरूच्या भूमिकेत दिसतील. शिवाला सर्व शक्तींच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतील. ब्रह्मास्त्र  हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

चित्रपटात दीपिका पादुकोण!‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दीपिका पादुकोण हिची सुद्धा भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियानुसार, दीपिका एक ‘जल अस्त्र’ असेल. 

‘ब्रह्मास्त्र’वर ‘बायकॉट’चं संकटगेल्या काही महिन्यात रिलीज झालेले बॉलिवूडचे अनेक मोठे सिनेमे दणादण आपटले. यादरम्यान अनेक चित्रपटांविरोधात सोशल मीडियावर बायकॉट मोहिम राबवली गेली. आता अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटावरही बायकॉटचं संकट घोंगावू लागलं आहे. रिलीजआधीच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. आता अशात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो? हे पाहणंही इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :ब्रह्मास्त्रअमिताभ बच्चनरणबीर कपूरआलिया भटकरण जोहर