Brahmastra Opening Day Box Office Collection: ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ड्रिम प्रोजेक्ट. हा सिनेमा बनायला चार वर्षे लागलीत. या काळात अनेकदा हा चित्रपट रखडला. पण आता ‘ब्रह्मास्त्र’ रिलीजसाठी सज्ज आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटची (Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 9 सप्टेंबरला चित्रपटगृहांत रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये असला तरी अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ब्रह्मास्त्रच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. रणबीर आणि आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'नं बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगले ओपनिंग कलेक्शन (Opening Collection) केलं आहे. पहिल्या दिवशी 'ब्रह्मास्त्र'चं १३ हजारहून अधिक शो थिएटरमध्ये झाले आणि तिकीटांचीही जोरदार विक्री झाली.
लोकांमध्ये या चित्रपटाची इतकी क्रेझ होती की पहिला शो सुरू होण्यापूर्वीच 'ब्रह्मास्त्र'ने ऑनलाइन शोच्या अॅडव्हान्स बुकिंगमधून 19.66 कोटी रुपये कमवले होते. आजतकच्या रिपोर्टनुसार, 'ब्रह्मास्त्र'नं बॉक्स ऑफिसवर जवळपास 36 कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले आहे. हा अंदाज चित्रपटाच्या ऑल इंडिया कमाईचा आहे. 'ब्रह्मास्त्र'च्या हिंदी व्हर्जनबद्दल बोलायचे झाले तर, अंदाजे 32 कोटींची कमाई झाली.
वर्ल्डवाइड कलेक्शन (Worldwide Collection)बद्दल बोलायचे झालं तर 'ब्रह्मास्त्र'नं इथंही बाजी मारली आहे आणि ग्लोबल बॉक्स ऑफिसवर त्याचं कलेक्शन 50 कोटींहून अधिक असू शकतं. हा प्राथमिक अंदाज आहे.