Join us

Brahmastra Advance Booking Day 16: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईत मोठी घट! अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून झाली इतकीच कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:25 IST

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाला आज दोन आठवडे पूर्ण झाले. दुसऱ्या आठवड्यात कमाईमध्ये मोठी घट झाली आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाला आज दोन आठवडे पूर्ण झाले. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने चांगली कमाई केली. त्याचवेळी दुसऱ्या आठवड्यात कमाईमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांसारख्या स्टार्सनी सजलेला 'ब्रह्मास्त्र' दुसऱ्या वीकेंडच्या अखेरीस 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाने 15 व्या दिवशी चांगले कलेक्शन केले आहे. ब्रह्मास्त्रच्या 16 व्या दिवसाच्या एडवांस  बुकिंगचा रिपोर्ट समोर आला आहे.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड पाहायला मिळाला, मात्र चित्रपटाच्या टीमने तेवढ्याच मेहनतीने प्रमोशन केलं, त्याचा फायदा झाला. तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड व हिंदी पाचं भाषेत ‘ब्रह्मास्त्र’ने 10 दिवसांत 212.44 कोटींची कमाई केली आहे. एकट्या हिंदी व्हर्जनने 10 दिवसांत 194 कोटींची कमाई केली आहे.   16व्या दिवशी चित्रपटाचे एकूण कलेक्शन 2.44 कोटी रुपये आहे.देशातील मेट्रो सिटीमध्ये या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. याचं कारण म्हणजे, ‘ब्रह्मास्त्र’ला फाईट देण्यासाठी कोणताही मोठा सिनेमा सध्या नाही.

दिग्दर्शक अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र तीन भागात आणणार आहे. हा एक ट्रिलॉजी चित्रपट आहे, ज्याचा दुसरा भाग २०२५ पर्यंत आणला जाणार आहे. आता हा फोटो पाहून आता चाहत्यांचे म्हणणे आहे की, ब्रह्मास्त्रच्या तिन्ही भागांची स्टारकास्ट दाखवणारा हा फोटो आहे.

 

टॅग्स :ब्रह्मास्त्ररणबीर कपूरआलिया भट