Join us

मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, करावी लागली अँजिओप्लास्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 10:54 PM

अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला.

अभिनेता  श्रेयस तळपदे याला गुरुवारी संध्याकाळी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. ४७ वर्षीय श्रेयसने संपूर्ण दिवस शुटींग केली आणि त्यानंतर तो हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्याला तातडीने   रुग्णालयात दाखल करावे लागले. अंधेरी पश्चिम येथील शहरातील बेलेव्ह्यू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली.

इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तळपदे पूर्णपणे बरा होता आणि त्याने अंडरप्रॉडक्शन मल्टीस्टारर चित्रपट 'वेलकम टू द जंगल'साठी संपूर्ण दिवस शूट केले. “त्याने दिवसभर चित्रीकरण केले, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सगळ्यांशी हसून बोलत होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला.” 

श्रेयस तळपदे रुग्णालयात दाखल आहेत. त्याला संध्याकाळी उशिरा आणण्यात आले. त्याच्या प्रकृतीच्या अपडेटची प्रतीक्षा आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे आणि त्याची प्रकृती आता बरी आहे. 

तळपदेने दोन दशकांच्या कारकिर्दीत ४५ हून अधिक चित्रपट केले आहेत. जंगल स्टार्समध्ये अक्षय कुमार रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक यांच्यासह मोठे कलाकार काम करत आहेत. 

टॅग्स :श्रेयस तळपदेमराठी अभिनेता